रायझिंग स्टार्स आशिया कप : वैभव सूर्यवंशीच्या ऐतिहासिक द्विशतकाच्या जोरावर भारताचा विजय
दोहा (कतार), 24 नोव्हेंबर, (हिं.स.) - वैभव सूर्यवंशीच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर, भारत ''अ'' संघाने युएईला सात गडी राखून पराभूत करत आशिया कप रायझिंग स्टार्स २०२६ च्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. युएईविरुद्ध वैभवने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत अ
वैभव सूर्यवंशी


दोहा (कतार), 24 नोव्हेंबर, (हिं.स.) - वैभव सूर्यवंशीच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर, भारत 'अ' संघाने युएईला सात गडी राखून पराभूत करत आशिया कप रायझिंग स्टार्स २०२६ च्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. युएईविरुद्ध वैभवने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत अवघ्या १६ चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावले. त्यानंतर त्याने २८ चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले, जे लिस्ट 'अ' क्रिकेटमधील सर्वात जलद शतक ठरले. वैभवने ५२ चेंडूंमध्ये आपले द्विशतक पूर्ण केले, जे लिस्ट 'अ' क्रिकेटमधील सर्वात जलद द्विशतक ठरले.

सूर्यवंशी नेपाळ आणि नंतर पाकिस्तानविरुद्ध मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला, पण त्याने युएईविरुद्ध शानदार फलंदाजी केली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, युएईने आपल्या निर्धारित ५० षटकांत ८ गडी गमावून २४९ धावा केल्या. हरप्रीत सिंग भाटियाने संघासाठी शानदार फलंदाजी करत १३० धावा केल्या आणि संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारण्यास मदत केली होची.

२५० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, भारत 'अ' संघाने अत्यंत आक्रमक सुरुवात केली. युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने युएईच्या गोलंदाजांना चांगलेच धारेवर धरले. त्याने अवघ्या ५३ चेंडूंमध्ये ७ चौकार आणि २८ षटकारांसह २०४ धावांची स्फोटक खेळी केली. वैभवच्या या वादळी फलंदाजीमुळे इंडिया 'अ' संघाने अवघ्या १४.२ षटकांत ३ गडी गमावून २५४ धावा केल्या आणि सामना जिंकला. अशाप्रकारे, वैभव सूर्यवंशीच्या या ऐतिहासिक खेळीने इंडिया 'अ' संघाला केवळ एक शानदार विजयच मिळवून दिला नाही, तर संघाचा उपांत्य फेरी गाठण्याचा मार्गही मोकळा केला.

युएईने भारताला २५० धावांचे लक्ष्य दिले होते. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, युएई संघाने हरप्रीत सिंगच्या शतकाच्या जोरावर ५० षटकांत ८ गडी गमावून २४९ धावा केल्या. भारताकडून अर्शद खानने चार बळी घेतले, तर हर्षित राणा, सूर्यांश शेडगे, हर्ष दुबे आणि शहबाज अहमद यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande