आयपीएल २०२७: पारस म्हाम्ब्रे पंजाब किंग्सचे गोलंदाजी प्रशिक्षक होणार
नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर (हिं.स.)पंजाब किंग्स पारस म्हाम्ब्रे यांची गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करणार आहे. गेल्या महिन्यात राजीनामा दिलेल्या जेम्स होप्स यांच्या जागी म्हाम्ब्रे यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. फ्रँचायझी राजीव कुमार यांची क्
पारस म्हाम्ब्रे


नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर (हिं.स.)पंजाब किंग्स पारस म्हाम्ब्रे यांची गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करणार आहे. गेल्या महिन्यात राजीनामा दिलेल्या जेम्स होप्स यांच्या जागी म्हाम्ब्रे यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. फ्रँचायझी राजीव कुमार यांची क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणूनही नियुक्ती करण्यात येईल. ते माजी क्षेत्ररक्षण प्रशिक्षक ब्रॅड हॅडिन यांची जागा घेतील. राजीव हे चेन्नई सुपर किंग्सच्या प्रशिक्षण संघाचा भाग होते.

पारस म्हाम्ब्रे यांना गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून मोठा अनुभव आहे. त्यांनी भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. म्हाम्ब्रे २०२१ ते २०२४ पर्यंत राहुल द्रविडच्या प्रशिक्षण संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक होते. त्यांनी इंडिया 'ए' आणि इंडिया अंडर-१९ संघांचे गोलंदाजी प्रशिक्षक म्हणूनही काम केले आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्यांनी बंगाल, महाराष्ट्र, बडोदा आणि विदर्भ संघांना प्रशिक्षण दिले आहे.

पारस म्हाम्ब्रे आयपीएलमध्ये बऱ्याच काळापासून मुंबई इंडियन्स संघाचा भाग आहेत. तो आयपीएलच्या पहिल्या हंगामात (२००८) सपोर्ट स्टाफ सदस्य म्हणून एमआयमध्ये सामील झाला. फ्रँचायझीने २०१० मध्ये त्याची सहायक प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली. त्याने २०१७ मध्ये संघ सोडला आणि त्यानंतर २०२४ ते २०२६ या कालावधीसाठी एमआयचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून परतला. पारस म्हाम्ब्रेचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून असलेला व्यापक अनुभव पंजाब किंग्ससाठी फायदेशीर ठरू शकतो, जो आपल्या पहिल्या आयपीएल विजेतेपदाच्या शोधात आहे. पंजाबची गोलंदाजी मजबूत करण्यासाठी म्हाम्ब्रेला मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांच्यासोबत मिळून काम करावे लागेल.

पंजाब किंग्स हा संघ लीगच्या पहिल्या हंगामापासून सहभागी आहे, पण त्यांना एकही विजेतेपद जिंकता आलेले नाही. आयपीएल २०१४ आणि आयपीएल २०२५ हे दोन हंगाम होते ज्यात पंजाब अंतिम फेरीत पोहोचला होता. आयपीएल २०२५ मध्ये श्रेयस अय्यर कर्णधार आणि रिकी पाँटिंग मुख्य प्रशिक्षक झाल्यामुळे संघाच्या विजेतेपद जिंकण्याच्या शक्यता वाढल्या आहेत. आयपीएल २०२५ च्या अंतिम फेरीत पोहोचल्यानंतर, पंजाबने आयपीएल २०२६ ची जोरदार सुरुवात केली आणि अर्धा हंगाम अव्वल स्थानी राहिला. पण, त्यानंतर कामगिरीत घसरण झाल्यामुळे संघाला प्लेऑफमधून बाहेर पडावे लागले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande