फ्लिपकार्टमध्ये ११ वर्षांहून अधिक काळ सेवा दिल्यानंतर कल्याण कृष्णमूर्ती सीईओपद सोडणार
नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर (हिं.स.)। फ्लिपकार्ट समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून ११ वर्षांहून अधिक काळ सेवा दिल्यानंतर कल्याण कृष्णमूर्ती हे पद सोडत आहेत. कंपनीने बुधवारी जारी केलेल्या निवेदनातून ही माहिती दिली. फ्लिपकार्ट समूहाचे सीईओ
Flipkart CEO Kalyan Krishnamurthy step down 11 yea


नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर (हिं.स.)। फ्लिपकार्ट समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून ११ वर्षांहून अधिक काळ सेवा दिल्यानंतर कल्याण कृष्णमूर्ती हे पद सोडत आहेत.

कंपनीने बुधवारी जारी केलेल्या निवेदनातून ही माहिती दिली. फ्लिपकार्ट समूहाचे सीईओ कल्याण कृष्णमूर्ती ११ वर्षांहून अधिक काळ कंपनीत काम केल्यानंतर आपल्या पदाचा राजीनामा देत आहेत. कंपनीच्या माहितीनुसार, नवीन कायमस्वरूपी सीईओची नियुक्ती होईपर्यंत मुख्य उत्पादन आणि तंत्रज्ञान अधिकारी बालाजी त्यागराजन हे अंतरिम नेतृत्वाची जबाबदारी सांभाळतील.

फ्लिपकार्टने सांगितले की, त्यागराजन सध्या कंपनीत मुख्य उत्पादन आणि तंत्रज्ञान अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. कृष्णमूर्ती यांच्या नेतृत्वाखाली कंपनीचा व्यवसाय पाच पटींपेक्षा अधिक वाढला असून, भारतातील आघाडीच्या ई-कॉमर्स कंपन्यांमध्ये फ्लिपकार्टचे स्थान अधिक मजबूत झाले आहे.

कंपनीने सांगितले की, त्यांच्या कार्यकाळात ‘द बिग बिलियन डेज’ हा उपक्रम भारतातील सणासुदीच्या काळातील खरेदीचा समानार्थी बनला. या काळात फ्लिपकार्टने अनेक नवीन उपक्रम सुरू केले आणि देशभरातील आपली व्याप्ती वाढवली.

आज फ्लिपकार्टच्या प्लॅटफॉर्मवर शॉप्सीच्या विक्रेत्यांसह १४ लाखांहून अधिक विक्रेते आहेत. तंत्रज्ञान आणि नवनवीन संशोधनाच्या माध्यमातून प्रत्येक भारतीयाला सक्षम बनवणे आणि त्यांना अधिक चांगला अनुभव देणे, हे उद्दिष्ट ठेवून फ्लिपकार्टने ‘कॅश ऑन डिलिव्हरी’, ‘नो कॉस्ट ईएमआय’, ‘सुलभ परतावा’ आणि ‘यूपीआय पेमेंट’ यांसारख्या सेवा सुरू केल्या आहेत. खरेदी-विक्रीच्या पलीकडे जाऊन फ्लिपकार्ट सातत्याने रोजगाराच्या संधी निर्माण करत आहे, उद्योजकांना सक्षम बनवत आहे आणि भारताची डिजिटल अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी योगदान देत आहे.

उल्लेखनीय म्हणजे, फ्लिपकार्ट समूह ही भारतातील प्रमुख डिजिटल वाणिज्य कंपन्यांपैकी एक असून, तिचा पाया मजबूत तंत्रज्ञानावर आधारित आहे. या समूहात प्रामुख्याने फ्लिपकार्ट, मिंत्रा, फ्लिपकार्ट होलसेल, क्लिअरट्रिप आणि सुपर.मनी यांसारख्या कंपन्यांचा समावेश आहे.

२००७ मध्ये स्थापन झालेल्या फ्लिपकार्टने लाखो विक्रेते, व्यापारी आणि लघुउद्योजकांना देशातील ई-कॉमर्स क्रांतीचा भाग बनण्यास मदत केली आहे. ५० कोटींहून अधिक नोंदणीकृत ग्राहकांसह फ्लिपकार्टच्या बाजारपेठेत ८० हून अधिक श्रेणींमध्ये १५ कोटींपेक्षा अधिक उत्पादने उपलब्ध आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande