
भारतातील सर्वात वेगवान स्कूटर ब्रँडचा मान
नागपूर, २५ नोव्हेंबर (हिं.स.) : टीव्हीएस मोटर कंपनीने तामिळनाडूतील होसूर उत्पादन प्रकल्पात टीव्हीएस ज्युपिटरच्या एक कोटीव्या युनिटचे उत्पादन पूर्ण केले. सर्वात कमी कालावधीत एक कोटी युनिट्सचा टप्पा गाठणारा ज्युपिटर हा भारतातील सर्वात वेगवान स्कूटर ब्रँड ठरला आहे. या कामगिरीमुळे देशातील प्रतिष्ठित मोबिलिटी ब्रँड म्हणून त्याचे स्थान अधिक भक्कम झाले आहे.
तेरा वर्षांचा प्रवास : २०१३ मध्ये 'ज्यादा का फायदा' या संकल्पनेसह ज्युपिटर बाजारात दाखल झाली. गेल्या १३ वर्षांत ती लाखो भारतीय कुटुंबांच्या दैनंदिन प्रवासाचा अविभाज्य भाग बनली आहे.
ग्राहकांना अधिक फायदा : उत्तम कामगिरी, अधिक मायलेज, आराम आणि सुविधा यांवर ब्रँडचा भर कायम आहे.
बदलत्या भारताचे प्रतीक : ग्राहकांच्या वाढत्या अपेक्षा आणि महत्त्वाकांक्षांनुसार 'ज्यादा' देण्याचे आश्वासन ज्युपिटरने सातत्याने विस्तारले आहे.
या यशाबद्दल टीव्हीएस मोटर कंपनीचे पीपल मोबिलिटी, इंडिया टू-व्हीलर बिझनेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष अनिरुद्ध हलदार म्हणाले की, गेल्या दशकात भारताची मानसिकता कमतरतेकडून आत्मविश्वास, विकास आणि समृद्धीकडे बदलली आहे. ग्राहकांच्या वाढत्या आकांक्षांचे प्रतीक म्हणून टीव्हीएस ज्युपिटर पुढे आली आहे.
एक कोटी भारतीयांच्या दैनंदिन प्रवासाचा भाग बनलेल्या ज्युपिटरने त्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला आहे. हा टप्पा ग्राहकांनी दाखवलेल्या विश्वासासोबतच कर्मचारी, डीलर भागीदार आणि पुरवठादारांच्या मेहनतीचे यश आहे. कंपनीच्या अभियांत्रिकी, उत्पादन आणि वितरण क्षमतांचाही यात मोठा वाटा असल्याचे त्यांनी नमूद केले. भारताच्या प्रगतीसोबत कंपनी भविष्यातही नवे टप्पे गाठेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पुढील वाटचाल :- बदलत्या भारताच्या गरजा आणि आकांक्षांनुसार ज्युपिटरमध्ये सातत्याने सुधारणा करण्यावर कंपनीचा भर राहणार आहे. दैनंदिन प्रवास अधिक सुखद, फायदेशीर आणि मूल्यवर्धित बनवतानाच 'ज्यादा' ही संकल्पना कायम ठेवून आगामी पिढ्यांसाठी विश्वासार्ह साथीदार बनण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.टीव्हीएस मोटर कंपनी ही टीव्हीएस समूहाचा भाग असून दुचाकी आणि तीनचाकी वाहन निर्मिती क्षेत्रातील जागतिक आघाडीची कंपनी आहे.
--------------------------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis