अॅमेझॉनच्या मंचावरून भारताची ई-कॉमर्स निर्यात २७ अब्ज अमेरिकी डॉलरवर
नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर (हिं.स.)। ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी अॅमेझॉनच्या ‘अॅमेझॉन ग्लोबल सेलिंग’ या कार्यक्रमांतर्गत भारतातून होणारी एकूण निर्यात 2,700 करोड़ डॉलर (२७ अब्ज) अमेरिकी डॉलरवर पोहोचली आहे. ई-कॉमर्स कंपनीने बुधवारी आपल्या ‘अॅमे
Indias e commerce exports Amazon platform reached


नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर (हिं.स.)। ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी अॅमेझॉनच्या ‘अॅमेझॉन ग्लोबल सेलिंग’ या कार्यक्रमांतर्गत भारतातून होणारी एकूण निर्यात 2,700 करोड़ डॉलर (२७ अब्ज) अमेरिकी डॉलरवर पोहोचली आहे.

ई-कॉमर्स कंपनीने बुधवारी आपल्या ‘अॅमेझॉन ग्लोबल सेलिंग’ कार्यक्रमाच्या माध्यमातून भारतातून एकूण २७ अब्ज डॉलरची निर्यात झाल्याची माहिती दिली. अॅमेझॉनने सांगितले की, या मंचावरील निर्यातदारांची संख्या एका वर्षात २० टक्क्यांनी वाढून २.४ लाख झाली आहे. कंपनीने सांगितले की, २०१५ मध्ये सुरू करण्यात आलेल्या या कार्यक्रमांतर्गत भारतात तयार झालेली एक अब्जाहून अधिक उत्पादने अॅमेझॉनच्या जागतिक बाजारपेठेतील ग्राहकांना विकण्यात आली आहेत.

अॅमेझॉनच्या माहितीनुसार, या कार्यक्रमांतर्गत ३६ हजारांहून अधिक निर्यातदारांसह नवी दिल्ली राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे. त्यानंतर राजस्थान (३२,५०० हून अधिक), उत्तर प्रदेश (२९,००० हून अधिक), गुजरात (२८,००० हून अधिक) आणि महाराष्ट्र (२३,५०० हून अधिक) यांचा क्रमांक लागतो.

कंपनीने सांगितले की, छोट्या शहरांमध्ये तामिळनाडूतील इरोड येथील निर्यातदारांनी जानेवारी २०२५ पासून २०२६ च्या तिसऱ्या तिमाहीपर्यंत १२.१५ कोटी अमेरिकी डॉलरहून अधिक विक्री केली आहे. कंपनीने निवेदनात म्हटले आहे की, ही उपलब्धी २०३० पर्यंत भारतातून एकूण आठ लाख कोटी डॉलरची ई-कॉमर्स निर्यात शक्य करण्याच्या आपल्या उद्दिष्टाच्या दिशेने झालेली प्रगती दर्शवते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande