
नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर (हिं.स.)। वाहन उत्पादक टीवीएस मोटर कंपनी तमिळनाडूमध्ये पुढील चार वर्षांत २ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. या गुंतवणुकीमुळे एक हजार रोजगारांच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे.
कंपनीने बुधवारी शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत ही घोषणा केली. दुचाकी आणि तीनचाकी वाहनांची निर्मिती करणाऱ्या या कंपनीने तमिळनाडू सरकारसोबत एक गैर-बाध्यकारी सामंजस्य करार (एमओयू) केला आहे. या करारानुसार कंपनी पुढील चार वर्षांत २ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून, त्यातून एक हजार नोकऱ्या निर्माण होणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, तमिळनाडू सरकार आपल्या मार्गदर्शक संस्था ‘गाइडन्स’च्या माध्यमातून टीवीएस मोटर कंपनीला आवश्यक पायाभूत सुविधा आणि नियामक प्रक्रियांमध्ये मदत उपलब्ध करून देणार आहे. ही मदत लागू असलेल्या कायद्यांच्या अधीन राहून दिली जाणार आहे.
टीवीएस मोटर कंपनी लिमिटेड ही भारतातील एक बहुराष्ट्रीय मोटारसायकल उत्पादक कंपनी असून, तिचे मुख्यालय चेन्नई येथे आहे. महसुलाच्या दृष्टीने ही भारतातील तिसरी सर्वात मोठी मोटारसायकल उत्पादक कंपनी आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule