सकारात्मक तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; सेन्सेक्स १,४४७ अंकांनी उसळला
नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर (हिं.स.)। आठवड्यातील तिसऱ्या व्यवहाराच्या दिवशी बुधवारी देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात तेजीने झाली. सेन्सेक्समध्ये १,४४७ अंकांची वाढ होऊन तो ८३,८५० च्या पातळीवर पोहोचला. तर निफ्टीमध्येही ४०० अंकांची तेजी नोंदवली गेली असून
Stock Market Weekly Analysis


नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर (हिं.स.)। आठवड्यातील तिसऱ्या व्यवहाराच्या दिवशी बुधवारी देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात तेजीने झाली. सेन्सेक्समध्ये १,४४७ अंकांची वाढ होऊन तो ८३,८५० च्या पातळीवर पोहोचला. तर निफ्टीमध्येही ४०० अंकांची तेजी नोंदवली गेली असून तो २५,७७५ च्या पातळीवर पोहोचला आहे.

बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचा (बीएसई) सेन्सेक्स सुरुवातीच्या व्यवहारात १,४४७.५२ अंक म्हणजेच १.७६ टक्क्यांच्या वाढीसह ८३,८८३.५१ अंकांच्या पातळीवर व्यवहार करत होता. तर नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा (एनएसई) निफ्टी ४२७.१५ अंक म्हणजेच १.६९ टक्क्यांच्या तेजीसह २५,७७६.८० अंकांच्या पातळीवर व्यवहार करत होता.

३० कंपन्यांचा समावेश असलेल्या बीएसई सेन्सेक्समधील समभागांमध्ये एचडीएफसी बँकेच्या समभागात ३.५४ टक्क्यांची वाढ झाली. याशिवाय इन्फोसिसमध्ये ३.४३ टक्के, आयसीआयसीआय बँकेत ३.१९ टक्के, बजाज फायनान्समध्ये २.६५ टक्के, अॅक्सिस बँकेत २.१३ टक्के आणि बजाज फिनसर्व्हमध्ये २.०९ टक्क्यांची तेजी दिसून आली.

उल्लेखनीय म्हणजे, २४ नोव्हेंबर रोजी गुरुनानक जयंतीच्या सुटीनिमित्त शेअर बाजार बंद होता. तर २३ नोव्हेंबर रोजी बाजार घसरणीसह बंद झाला होता. सेन्सेक्समध्ये १,४८३ अंकांची घसरण होऊन तो ८२,४३५ अंकांवर बंद झाला होता. त्याचबरोबर निफ्टीमध्येही ४५० अंकांची घसरण होऊन तो २५,३४९ अंकांवर बंद झाला होता.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande