एअरप्रो टेक्नोलॉजी इंडिया लिमिटेडचा आयपीओ २७ नोव्हेंबरला खुला होणार
मुंबई, 26 नोव्हेंबर (हिं.स.) - एअरप्रो टेक्नोलॉजी इंडिया लिमिटेड, वायर्ड आणि वायरलेस नेटवर्किंग उत्पादने व सोल्यूशन्स पुरवणारी तंत्रज्ञान-आधारित कंपनी असलेली एअरप्रो टेक्नोलॉजी इंडिया लिमिटेड आपला प्रारंभिक सार्वजनिक प्रस्ताव (आयपीओ) शुक्रवार, २७ न
एअरप्रो टेक्नोलॉजी इंडिया लिमिटेड


मुंबई, 26 नोव्हेंबर (हिं.स.) - एअरप्रो टेक्नोलॉजी इंडिया लिमिटेड, वायर्ड आणि वायरलेस नेटवर्किंग उत्पादने व सोल्यूशन्स पुरवणारी तंत्रज्ञान-आधारित कंपनी असलेली एअरप्रो टेक्नोलॉजी इंडिया लिमिटेड आपला प्रारंभिक सार्वजनिक प्रस्ताव (आयपीओ) शुक्रवार, २७ नोव्हेंबर २०२६ रोजी खुला करणार आहे. या आयपीओच्या माध्यमातून कंपनीचे ३५.६४ कोटी रुपये उभारण्याचे उद्दिष्ट असून, कंपनीचे शेअर्स एनएसई इमर्ज प्लॅटफॉर्मवर सूचीबद्ध केले जाणार आहेत.

या इश्यूमध्ये प्रत्येकी १० रुपये दर्शनी मूल्याचे एकूण ३६,००,००० इक्विटी शेअर्सपर्यंत समावेश असून, प्रति शेअर ९९ रुपये इश्यू प्राईस निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये २९,२०,००० इक्विटी शेअर्सपर्यंतचा फ्रेश इश्यू आणि विक्री करणाऱ्या भागधारकांकडून ६,८०,००० इक्विटी शेअर्सपर्यंतचा ऑफर फॉर सेल (ओएफएस) यांचा समावेश आहे.

इक्विटी शेअर्सचे वाटप

• नॉन-इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स (NII)– किमान १७,०८,८०० इक्विटी शेअर्स

• वैयक्तिक गुंतवणूकदार – किमान १७,११,२०० इक्विटी शेअर्स

• मार्केट मेकर – १,८०,००० इक्विटी शेअर्स

आयपीओमधून मिळणाऱ्या निव्वळ निधीचा वापर उत्पादन सुविधेसाठी यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी भांडवली खर्चाची पूर्तता, जयपूर येथे कारखान्यासाठी जमीन अधिग्रहणाच्या उर्वरित रकमेचे पेमेंट, जयपूर येथील कारखान्याच्या इमारतीच्या बांधकामासाठी भांडवली खर्च, कंपनीच्या खेळत्या भांडवलाची गरज पूर्ण करण्यासाठी तसेच सर्वसाधारण कॉर्पोरेट उद्देशांसाठी केला जाणार आहे. हा आयपीओ शुक्रवार, २७ नोव्हेंबर २०२६ रोजी खुला होणार असून, मंगळवार, १ डिसेंबर २०२६ रोजी बंद होणार आहे.

या इश्यूचे लीड मॅनेजर होरिझॉन मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड असून, रजिस्ट्रार म्हणून एमयूएफजी इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड काम पाहणार आहे.

एअरप्रो टेक्नोलॉजी इंडिया लिमिटेडचे प्रवर्तक आणि व्यवस्थापकीय संचालक दीपक जैन यांनी सांगितले की, “आजच्या वाढत्या कनेक्टिव्हिटीच्या जगात विश्वासार्ह नेटवर्किंग सोल्यूशन्स ही केवळ निवड राहिलेली नसून, ती एक गरज बनली आहे. एअरप्रो टेक्नोलॉजी इंडियालिमिटेडमध्ये आम्ही या बदलत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहोत. आमचा आगामी आयपीओ हा आमच्या क्षमता अधिक मजबूत करण्याच्या आणि विकासाच्या नव्या संधी विस्तारण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे.

गेल्या काही वर्षांत, ग्राहकांच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी विश्वासार्ह, विस्तारक्षम आणि किफायतशीर नेटवर्किंग तसेच वायरलेस कनेक्टिव्हिटी सोल्यूशन्स पुरवण्यावर विशेष लक्ष केंद्रित करून आम्ही आमचा व्यवसाय उभारला आहे.

या आयपीओमुळे आम्हाला उत्पादन पायाभूत सुविधा अधिक मजबूत करणे, कार्यान्वयन क्षमता वाढवणे आणि खेळत्या भांडवलाच्या गरजा पूर्ण करणे शक्य होणार आहे. या भांडवली गुंतवणुकीमुळे भविष्यातील विकासासाठी अधिक भक्कम पाया तयार होईल आणि नेटवर्किंग सोल्यूशन्स उद्योगातील आमचे स्थान अधिक मजबूत होईल, असा आम्हाला विश्वास आहे.

या नव्या अध्यायाची सुरुवात करताना, नावीन्य, गुणवत्ता, ग्राहकांचे समाधान आणि शाश्वत व्यावसायिक विकासाद्वारे दीर्घकालीन मूल्यनिर्मिती करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आमच्या या प्रवासाचा अविभाज्य भाग असलेल्या ग्राहकांचे, कर्मचाऱ्यांचे, भागीदारांचे आणि सर्व हितचिंतकांचे आम्ही मनःपूर्वक आभार मानतो.”

होरिझॉन मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड मयूर बंका आणि उपाध्यक्ष राहुल बजाज यांनी सांगितले की,“एअरप्रो टेक्नोलॉजी इंडियालिमिटेडने नेटवर्किंग आणि वायरलेस कनेक्टिव्हिटी सोल्यूशन्स क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले असून, उद्योग आणि संस्थांच्या बदलत्या कनेक्टिव्हिटीविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी कंपनी कार्यरत आहे. नेटवर्किंग उत्पादनांमधील कंपनीचे कौशल्य, उत्पादन क्षमता मजबूत करण्यावर आणि कार्यान्वयन पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यावर असलेल्या लक्ष केंद्रित दृष्टिकोनासह, कंपनीच्या विकासाच्या पुढील टप्प्यासाठी भक्कम पाया उपलब्ध करून देते.

प्रस्तावित आयपीओ हा कंपनीच्या विकासाच्या प्रवासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. फ्रेश इश्यूमधून मिळणाऱ्या निधीचा वापर यंत्रसामग्रीसाठी भांडवली खर्च, जमीन अधिग्रहण, कारखाना सुविधेचे बांधकाम तसेच खेळत्या भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी केला जाणार आहे. या प्रस्तावित भांडवली गुंतवणुकीमुळे कंपनीला आपली कार्यान्वयन क्षमता वाढवण्यास आणि दीर्घकालीन व्यावसायिक उद्दिष्टे साध्य करण्यास मदत होईल, असा आम्हाला विश्वास आहे.

एअरप्रो टेक्नोलॉजी इंडिया लिमिटेडच्या सार्वजनिक सूचीबद्ध कंपनी बनण्याच्या प्रवासात सहभागी होताना आम्हाला आनंद होत आहे.”

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande