जळगावात सोनं २ हजारांनी, तर चांदी ४ हजारांनी महागली
जळगाव , 26 नोव्हेंबर (हिं.स.) मागील आठवड्यात सलग घसरण होत असल्याने सोन्या-चांदीच्या खरेदीदारांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र, या आठवड्यात दोन्ही धातूंच्या दरात सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहेत. काल झालेल्या मोठ्या घसरणीनंतर आज गुरुवारी बाजार
जळगावात सोनं २ हजारांनी, तर चांदी ४ हजारांनी महागली


जळगाव , 26 नोव्हेंबर (हिं.स.) मागील आठवड्यात सलग घसरण होत असल्याने सोन्या-चांदीच्या खरेदीदारांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र, या आठवड्यात दोन्ही धातूंच्या दरात सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहेत. काल झालेल्या मोठ्या घसरणीनंतर आज गुरुवारी बाजार सुरू होताच सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा जोरदार वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात २ हजार रुपयांची, तर चांदीच्या दरात तब्बल ४ हजार रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांना पुन्हा महागाईचा फटका बसला आहे. जळगावच्या सराफ बाजारात आज सोन्याचा भाव १ लाख २४ हजार ८०० रुपयांवर पोहोचला आहे. तर चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली असून चांदी आता १ लाख ५३ हजार रुपये प्रतिकिलोवर पोहोचली आहे.गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या किमतीत सातत्याने चढ-उतार सुरू असल्याने ग्राहकांमध्ये खरेदीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. सोन्या-चांदीच्या बाजारात सध्या मोठी अस्थिरता पाहायला मिळत आहे. कधी अचानक घसरण तर कधी मोठी दरवाढ होत असल्याने ग्राहक आणि सराफ व्यावसायिक दोघांचेही लक्ष बाजारातील हालचालींकडे लागले आहे. आगामी दिवसांत सोन्या-चांदीचे दर कोणती दिशा घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande