
नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर (हिं.स.) - हार्ले-डेव्हिडसनचे प्रेसिडंट व सीईओ आर्टी स्टार्स आणि हिरो मोटोकॉर्पचे एक्झिक्युटिव्ह चेअरमन डॉ. पवन मुंजाळ यांनी जगातील सर्वात मोठी दुचाकी बाजारपेठेत हार्ले-डेव्हिडसन ब्रँडची उपस्थिती अधिक दृढ करण्यासाठी मिशन: द बिग राइड या धोरणात्मक उपक्रमाद्वारे आपली कटिबद्धता व्यक्त केली आहे. भारतातील बाजारपेठेत प्रवेश करून १७ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हिरो मोटोकॉर्पसोबत सहयोगाने राबवला जाणारा हा उपक्रम अधिक चांगला ग्राहक अनुभव, डीलर नेटवर्कचा विस्तार, व्यापक उत्पादन पोर्टफोलिओ आणि देशातील वाढत्या प्रीमियम मोटरसायकल व रायडर समुदायाशी अधिक सखोल संवाद साधण्यावर लक्ष केंद्रित करेल.
हिरो मोटोकॉर्पचे एक्झिक्युटिव्ह चेअरमन डॉ. पवन मुंजाळ म्हणाले, हार्ले-डेव्हिडसनसोबत आमचा सहयोग पूरक सामर्थ्य असलेल्या दोन प्रबळ आणि प्रतिष्ठित संस्थांना एकत्र आणतो. हे सामर्थ्य म्हणजे हार्ले-डेव्हिडसनचा ऐतिहासिक ब्रँड व उत्पादनांचा वारसा आणि हिरो मोटोकॉर्पची भारतातील ग्राहकांबद्दलची सखोल समज, उत्पादन उत्कृष्टता, अभियांत्रिकी क्षमता आणि बाजारपेठेतील व्यापक पोहोच. एकत्रितपणे, आम्ही भारतातील वाढत्या प्रीमियम मोटरसायकल क्षेत्रात नवीन संधी निर्माण करताना हार्ले-डेव्हिडसन ब्रँडचा अनुभव अधिक मोठ्या ग्राहकवर्गापर्यंत पोहोचवणे शक्य केले आहे. भारतात हार्ले-डेव्हिडसनची १७ वर्षे साजरी करत असताना आम्ही या प्रबळ पायावर उभे राहून हा सहयोग नव्या उंचीवर नेण्यासाठी कटिबद्ध आहोत.
हार्ले-डेव्हिडसनचे ग्लोबल सीईओ आर्टी स्टार्स म्हणाले, हिरो मोटोकॉर्पसोबत आमचा सहयोग आम्हाला भारतात सातत्याने प्रगती करण्यासाठी प्रबळ पाया देतो, तसेच हार्ले-डेव्हिडसनची जागतिक ब्रँड ओळख आणि उत्पादनातील कौशल्याला हिरो मोटोकॉर्पच्या व्यापक रिटेल नेटवर्कसह एकत्र आणतो. या वर्षी आम्ही आमच्या सर्वच श्रेणींमध्ये बाजारपेठेतील हिस्सा वाढल्याचे पाहिले आहे, ज्यामधून वाढती मागणी आणि किरकोळ विक्रीतील सातत्यपूर्ण गती निदर्शनास येते. पुढे जात, हार्ले-डेव्हिडसन समुदायाचा विस्तार करत असताना रायडर्स आणि डीलर्ससोबत आमचे नाते अधिक घट्ट करण्याची संधी आमच्याकडे आहे.
उत्पादन श्रेणी अधिक दृढ करणे
आपल्या भारत धोरणाचा भाग म्हणून, हार्ले-डेव्हिडसन कस्टम वेईकल ऑपरेशन्स, टूरिंग, क्रूझर्स (सॉफ्टेल), अॅडव्हेंचर टूरिंग आणि स्पोर्ट श्रेणींमध्ये आपला जागतिक मोटरसायकल पोर्टफोलिओ सादर करते. तसेच, ब्रँड हार्ले-डेव्हिडसन एक्स श्रेणीअंतर्गत नवीन मॉडेल्स सादर करणे सुरू ठेवेल.
अधिक प्रबळ रायडिंग समुदाय घडवणे
मार्च २०२७ पर्यंत उत्साहवर्धक उपक्रमांच्या कॅलेंडरसह उत्साही रायडिंग समुदाय हार्ले-डेव्हिडसनच्या ओळखीचा केंद्रबिंदू आहे. यामध्ये नॉर्दर्न आणि ईस्टर्न एच.ओ.जी. राइड्स, फ्लॅट ट्रॅक रेसिंग, हार्ले रॉक रायडर्स आणि कस्टम बिल्ड-ऑफसह इंडिया बाइक वीकमध्ये सहभाग, इंडिया एच.ओ.जी. रॅली आणि डेस्टिनेशन एक्स यांचा समावेश आहे.
३,००० हून अधिक सदस्यांसह, भारतातील हार्ले ओनर्स ग्रुप आशियातील उदयोन्मुख बाजारपेठांमधील सर्वात मोठे एच.ओ.जी. नेटवर्क आहे. या प्रबळ रायडर बंधुत्वाला अधिक दृढ करत २७-२८ नोव्हेंबर २०२६ रोजी थायलंडमध्ये होणाऱ्या आशिया हार्ले डेजमध्ये भारतातील १०० हून अधिक हार्ले-डेव्हिडसन रायडर्स सहभागी होणार आहेत, ज्यामुळे या प्रादेशिक इव्हेण्टमध्ये सर्वाधिक प्रतिनिधित्व करणाऱ्या बाजारपेठांत भारताचा समावेश झाला आहे.
प्रबळ व्यावसायिक गती आणि विस्तारणारे रिटेल नेटवर्क
हार्ले-डेव्हिडसनने भारतात मैलाचा दगड पार केला आहे, जिथे २०१० मध्ये आपले डीलर कामकाज सुरू केल्यापासून एकत्रित ग्राहक संख्येने ८०,००० मोटरसायकलचा टप्पा ओलांडला आहे. हिरो मोटोकॉर्पसोबत संयुक्तपणे विकसित केलेली हार्ले-डेव्हिडसन एक्स श्रेणी विकासाची प्रमुख चालक म्हणून उदयास आली आहे. २०२३ मध्ये लाँच झाल्यापासून या श्रेणीने ५०,००० हून अधिक युनिट्सचे योगदान दिले आहे आणि प्रीमियम मोटरसायकल ग्राहकांमध्ये ब्रँडची पोहोच विस्तारली आहे.
भारतातील आपली उपस्थिती अधिक दृढ करत, हिरो मोटोकॉर्प आणि हार्ले-डेव्हिडसन यांच्यातील धोरणात्मक सहयोगांतर्गत रायपूर आणि इंदोर येथे दोन नवीन फुल-लाइन डीलरशिप्सची भर पडणार आहे, ज्यामुळे संपूर्ण भारतातील डीलरशिप नेटवर्क २३ पर्यंत पोहोचेल. याला पूरक म्हणून, हार्ले-डेव्हिडसन एक्स मोटरसायकलच्या विक्रीस पाठबळ देणारे हिरो प्रीमिया १५२ आऊटलेट्सपर्यंत विस्तारले असून त्याचा पुढील विस्तार सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी