
रत्नागिरी, 27 नोव्हेंबर (हिं.स.) । येत्या ३ जानेवारी २०२७ रोजी रत्नागिरी येथे चौथ्या कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच २८ मार्च २०२७ रोजी गणपतीपुळे अल्ट्रा मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले असून, दोन्हीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन प्रसाद देवस्थळी यांनी केले आहे.
कोकण कोस्टल मॅरेथॉनमध्ये ५ किमी, १० किमी आणि २१ किमी अशा तीन अंतरांच्या शर्यती होणार आहेत. गणपतीपुळे अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये २८ किमी, ४२ किमी आणि ५६ किमी अशा अंतरांची आव्हाने धावपटूंसाठी उपलब्ध असणार आहेत.
कोकणचा निसर्ग, समुद्रकिनारे आणि निसर्गरम्य रस्त्यांवर धावण्याचा अनुभव घेण्यासाठी तसेच स्वतःच्या फिटनेसला नवे आव्हान देण्यासाठी जास्तीत जास्त धावपटूंनी या स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. प्रसाद देवस्थळी यांनी कोकणातील तसेच राज्यभरातील धावपटूंना आगामी स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी