
नाशिक, 27 नोव्हेंबर (हिं.स.)। नशा
करून सार्वजनिक ठिकाणी जोरजोरात ओरडून गोंधळ घालणाऱ्या महिलेने तीन महिला पोलीस अंमलदारांना मारहाण केल्याची घटना मुंबई नाक्याजवळ घडली.
फिर्यादी महिला पोलीस अंमलदार सोनाली थोरात यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की संशयित हीना जीवन कापसे (वय ३३, रा. निलगिरी बाग, पंचवटी) हिने कशाची तरी नशा करून मुंबई
नाका येथील संदीप हॉटेल परिसरात जोरजोरात ओरडून शांततेचा भंग केला. यावेळी फिर्यादी थोरात यांनी तिला तिचे नाव व पत्ता विचारला असता कापसे हिने फिर्यादीचे केस ओढले व महिला पोलीस अंमलदार पगारे हिच्या पोटात लाथ मारली. त्यावेळी संशयित महिलेला गाडीत बसविले असता तिने महिला पोलीस अंमलदार शेळके यांनाही मारहाण करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक इनामके करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI