भालाफेकपटू अन्नू राणीवर गुडघ्याची शस्त्रक्रिया; पुन्हा स्पर्धेत उतरण्याचे लक्ष्य
नवी दिल्ली, 04 नोव्हेंबर (हिं.स.)दोन वेळा ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेली आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतील माजी विजेती, भालाफेकपटू अन्नू राणीवर दोहामध्ये गुडघ्याची यशस्वी शस्त्रक्रिया झाली आहे. गेल्या वर्षभरापासून ती दुखापती आणि सततच्या वेदनांशी झुंज देत ह
अन्नू राणी


नवी दिल्ली, 04 नोव्हेंबर (हिं.स.)दोन वेळा ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेली आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतील माजी विजेती, भालाफेकपटू अन्नू राणीवर दोहामध्ये गुडघ्याची यशस्वी शस्त्रक्रिया झाली आहे. गेल्या वर्षभरापासून ती दुखापती आणि सततच्या वेदनांशी झुंज देत होती. आता पुन्हा एकदा स्पर्धेत उतरून देशाचे प्रतिनिधित्व करण्याचा तिचा निर्धार आहे.टोकियो २०२० आणि पॅरिस २०२४ ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारी अन्नू राणीने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली. तिने सांगितले की, गेल्या वर्षभराचा काळ तिच्या क्रीडा कारकिर्दीतील सर्वात कठीण टप्प्यांपैकी एक होता.

सोशल मीडियावर पोस्ट करत अन्नूने लिहिले, मला हे सांगताना आनंद आणि कृतज्ञता वाटत आहे की, दोहामध्ये माझ्या गुडघ्याची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली आहे.गेल्या वर्षभरापासून मी गुडघ्याच्या दुखापतींशी आणि सततच्या वेदनांशी संघर्ष करत होते. माझ्या क्रीडा कारकिर्दीतील हा सर्वात आव्हानात्मक टप्प्यांपैकी एक होता, कारण वेदनांमुळे सराव करणे, स्पर्धांमध्ये भाग घेणे आणि मला सर्वात जास्त आवडणारी गोष्ट करत राहणे कठीण झाले होते, असे तिने सांगितले.

ती पुढे म्हणाली, आता संयम, समर्पण, कठोर परिश्रम आणि सावरण्याच्या एका नवीन प्रवासाची सुरुवात होत आहे. मला माहीत आहे की पुढचा मार्ग सोपा नसेल, पण भारताचे पुन्हा प्रतिनिधित्व करण्याचा माझा निर्धार पूर्वीपेक्षा अधिक प्रबळ आहे. तिने शेवटी म्हटले, माझे स्वप्न अजूनही जिवंत आहे. मी कठोर परिश्रम करेन, अधिक ताकदीनिशी परत येईन आणि भारताला गौरवांकित करण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न करेन.

२०२६ चा हंगाम अन्नूसाठी दुखापतींच्या समस्यांमुळे कठीण ठरला. महिलांच्या भालाफेक प्रकारात ६३.८२ मीटर अंतरासह राष्ट्रीय विक्रम तिच्या नावावर आहे, जो तिने २०२२ मध्ये नोंदवला होता. यावर्षी तिने आठ स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि त्यापैकी तीन जिंकल्या, पण एकाही स्पर्धेत तिला ६० मीटरचा टप्पा ओलांडता आला नाही. सप्टेंबर महिन्यात नवी दिल्ली येथे झालेल्या 'इंडियन ॲथलेटिक्स फायनल सीरिज'मध्ये तिने ५७.५० मीटर अशी या हंगामातील सर्वोत्तम कामगिरी नोंदवली.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande