महिला इमर्जिंग नेशन्स ट्रॉफीसाठी बांगलादेश संघाची घोषणा
ढाका, ४ नोव्हेंबर (हि.स.)संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथे होणाऱ्या आगामी आयसीसी महिला इमर्जिंग नेशन्स ट्रॉफीसाठी बांगलादेशने आपल्या संघाची घोषणा केली आहे. या १० संघांच्या स्पर्धेत नाहिदा अख्तर बांगलादेशचे नेतृत्व करेल. गेल्या महिन्यात, निगार सुलताना
महिला इमर्जिंग नेशन्स ट्रॉफीसाठी बांगलादेश संघाची घोषणा


ढाका, ४ नोव्हेंबर (हि.स.)संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथे होणाऱ्या आगामी आयसीसी महिला इमर्जिंग नेशन्स ट्रॉफीसाठी बांगलादेशने आपल्या संघाची घोषणा केली आहे. या १० संघांच्या स्पर्धेत नाहिदा अख्तर बांगलादेशचे नेतृत्व करेल. गेल्या महिन्यात, निगार सुलताना ज्योतीच्या जागी तिची संघाची नवीन कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. कर्णधार बनल्यानंतरची ही नाहिदाची पहिली मोठी स्पर्धा असेल, ज्यात तिच्या नेतृत्व कौशल्याची कसोटी लागेल.

बांग्लादेशला पाकिस्तान, थायलंड, नेदरलँड्स आणि झिम्बाब्वे यांच्यासोबत 'ब' गटात स्थान देण्यात आले आहे. ही स्पर्धा १२ नोव्हेंबरपासून सुरू होईल आणि अंतिम सामना २५ नोव्हेंबरला होणार आहे. अनुभवी फलंदाज सोभना मोस्तारीला उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. माजी कर्णधार निगार सुलताना ज्योतीचाही १५ सदस्यीय संघात समावेश असून ती खेळणे सुरू ठेवेल.

आयसीसीच्या वेबसाइटनुसार, संघाची आघाडीची वेगवान गोलंदाज मरुफा अख्तर घोट्याच्या दुखापतीमुळे या स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही. तिच्या जागी वेगवान गोलंदाज दिशा बिस्वासचा समावेश करण्यात आला आहे. सलामीवीर साथी राणी आणि अष्टपैलू जन्नतुल फिरदौस सुमोना यांचेही संघात पुनरागमन झाले आहे.

बांगलादेश 12 नोव्हेंबरला पाकिस्तानविरुद्धच्या मोहिमेला सुरुवात करेल. अजमान (UAE) येथील कारवान क्रिकेट मैदानावर हा सामना होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande