अमरावती - फटाका दुकान चोरीचा छडा; तीन आरोपी जेरबंद
अमरावती, 05 नोव्हेंबर, (हिं.स.) वलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फटाका दुकान चोरी प्रकरणाचा गुन्हे शाखेने यशस्वी छडा लावत तीन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून चोरीला गेलेला सुमारे ५० हजार रुपये किमतीचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. गुन्
फटाका दुकान चोरीचा छडा; तीन आरोपी जेरबंद! गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; ५० हजारांचा शंभर टक्के मुद्देमाल हस्तगत


अमरावती, 05 नोव्हेंबर, (हिं.स.) वलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फटाका दुकान चोरी प्रकरणाचा गुन्हे शाखेने यशस्वी छडा लावत तीन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून चोरीला गेलेला सुमारे ५० हजार रुपये किमतीचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी केलेल्या प्रयत्नांना यश मिळाले आहे.

पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करीत असताना त्यांना फटाका दुकान चोरी प्रकरणातील आरोपींबाबत गोपनीय माहिती मिळाली असता पोलिसांनी अक्षय उर्फ अभी प्रभाकर पतंगराव (वय २४, रा. कामुंजा, वलगाव), तेजस उर्फ चेतन राजू भांबुरकर (वय २४, रा. समतानगर, वलगाव) आणि शैलेश उर्फ भुऱ्या गजानन देवरे (वय २०, रा. समतानगर, वलगाव) या तिघांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्यांनी सदर चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यांच्याकडून चोरीला गेलेला ५० हजार रुपये किमतीचा शंभर टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पुढील तपास व कायदेशीर कारवाईसाठी आरोपींसह जप्त मुद्देमाल वलगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके, श्याम घुगे व प्रांजली सोनावणे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. सहायक पोलीस आयुक्त निलेश ब्राह्मणे, गुन्हे शाखा युनिट १ चे पोलीस निरीक्षक दिनेश दहातोंडे व युनिट २ चे पोलीस निरीक्षक अतुल वर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कामगिरी केली.या पथकात सपोनि महेश इंगोले, पोउपनि गजानन सोनुने यांच्यासह दीपक सुंदरकर, सुनील लासूरकर, सचिन बहाळे, गजानन ढेवले, आस्तिक देशमुख, मंगेश परिमल, मनोज, झहीर शेख ठोसर, अतुल संभे, राजिक रायलीवाले, नईम बेग, विकास गुडधे, विशाल वाकपांजर, योगेश पवार, संदीप खंडारे, सुधीर गुडघे, चेतन गुल्हाने व निलेश किल्लेकर यांचा सहभाग होता.

------------------------------------------------------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande