धनत्रयोदशीला सराफा बाजारात सोने-चांदीच्या दरात वाढ
नवी दिल्ली, 06 नोव्हेंबर (हिं.स.)। देशांतर्गत सराफा बाजारात आज धनत्रयोदशीच्या दिवशी सुरुवातीच्या व्यवहारात मोठी तेजी पाहायला मिळत आहे. सोन्याच्या दरात वाढ झाल्यामुळे चेन्नई वगळता देशातील बहुतांश सराफा बाजारात सोने प्रति १० ग्रॅममागे २ हजार ९५० रुपय
Bullion Market Gold Silver


नवी दिल्ली, 06 नोव्हेंबर (हिं.स.)। देशांतर्गत सराफा बाजारात आज धनत्रयोदशीच्या दिवशी सुरुवातीच्या व्यवहारात मोठी तेजी पाहायला मिळत आहे. सोन्याच्या दरात वाढ झाल्यामुळे चेन्नई वगळता देशातील बहुतांश सराफा बाजारात सोने प्रति १० ग्रॅममागे २ हजार ९५० रुपयांपासून ३ हजार २२० रुपयांपर्यंत महागले आहे. तर चेन्नईमध्ये सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅममागे २ हजार ८५० रुपयांपासून ३ हजार ११० रुपयांपर्यंत वाढ नोंदवण्यात आली आहे. दुसरीकडे, सलग चार दिवस एकाच दरावर व्यवहार केल्यानंतर आज चांदीच्या दरातही तेजी दिसून आली आहे. सराफा बाजारात प्रत्यक्ष चांदीचा भाव प्रति किलो १० हजार २०० रुपयांपर्यंत वाढला आहे.

दरात झालेल्या बदलामुळे देशातील विविध सराफा बाजारांमध्ये आज २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १ लाख ४६ हजार ३० रुपयांपासून १ लाख ४६ हजार १८० रुपयांपर्यंत व्यवहार करत आहे. त्याचप्रमाणे २२ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम १ लाख ३३ हजार ८६० रुपयांपासून १ लाख ३४ हजार १० रुपयांदरम्यान विकले जात आहे. दुसरीकडे, चांदीच्या दरातही तेजी आल्याने दिल्लीच्या सराफा बाजारात आज चांदीचा भाव प्रति किलो २ लाख १० हजार १०० रुपयांवर पोहोचला आहे.

दिल्लीत आज २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १ लाख ४६ हजार १८० रुपये, तर २२ कॅरेट सोन्याचा भाव १ लाख ३४ हजार १० रुपये नोंदवण्यात आला आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत २४ कॅरेट सोने १ लाख ४६ हजार ३० रुपये आणि २२ कॅरेट सोने १ लाख ३३ हजार ८६० रुपये प्रति १० ग्रॅम दराने विकले जात आहे. त्याचप्रमाणे अहमदाबादमध्ये २४ कॅरेट सोन्याचा किरकोळ भाव प्रति १० ग्रॅम १ लाख ४६ हजार ८० रुपये, तर २२ कॅरेट सोन्याचा भाव १ लाख ३३ हजार ९१० रुपये नोंदवण्यात आला आहे.

या प्रमुख शहरांव्यतिरिक्त चेन्नईमध्ये आज २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम १ लाख ४६ हजार ३० रुपये आणि २२ कॅरेट सोने १ लाख ३३ हजार ८६० रुपये दराने विकले जात आहे. त्याचप्रमाणे कोलकातामध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव १ लाख ४६ हजार ३० रुपये आणि २२ कॅरेट सोन्याचा भाव १ लाख ३३ हजार ८६० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. भोपाळमध्ये २४ कॅरेट सोन्याची किंमत १ लाख ४६ हजार ८० रुपये, तर २२ कॅरेट सोन्याची किंमत १ लाख ३३ हजार ९१० रुपये आहे.

जयपूरमध्ये २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम १ लाख ४६ हजार १८० रुपये आणि २२ कॅरेट सोने १ लाख ३४ हजार १० रुपये दराने विकले जात आहे. पाटण्यात २४ कॅरेट सोन्याचा भाव १ लाख ४६ हजार ८० रुपये, तर २२ कॅरेट सोन्याचा भाव १ लाख ३३ हजार ९१० रुपये आहे. चंदीगडमध्ये २४ कॅरेट सोन्याची किंमत १ लाख ४६ हजार १८० रुपये, तर २२ कॅरेट सोन्याची किंमत १ लाख ३४ हजार १० रुपये नोंदवण्यात आली आहे. लखनौच्या सराफा बाजारात आज २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम १ लाख ४६ हजार १८० रुपये आणि २२ कॅरेट सोने १ लाख ३४ हजार १० रुपये दराने विकले जात आहे.

देशातील अन्य राज्यांप्रमाणे कर्नाटक, तेलंगणा आणि ओडिशा येथील सराफा बाजारातही आज सोन्याच्या दरात मजबुती दिसून येत आहे. या तिन्ही राज्यांच्या राजधानी असलेल्या बंगळुरू, हैदराबाद आणि भुवनेश्वरमध्ये आज २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १ लाख ४६ हजार ३० रुपये आहे. त्याचप्रमाणे या तिन्ही शहरांमधील सराफा बाजारात २२ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम १ लाख ३३ हजार ८६० रुपये दराने विकले जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande