सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी बडोदा संघात हार्दिक पांड्याचा समावेश नाही
नवी दिल्ली, ७ नोव्हेंबर (हिं.स.)भारतीय अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांड्याच्या स्पर्धात्मक क्रिकेटमधील पुनरागमनाची प्रतीक्षा अधिकच लांबली आहे. आगामी सय्यद मुश्ताक अली टी-२० ट्रॉफीसाठी जाहीर झालेल्या बडोदाच्या १५ सदस्यीय संघात हार्दिकचा समावेश नाही.
हार्दिक पांड्या


नवी दिल्ली, ७ नोव्हेंबर (हिं.स.)भारतीय अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांड्याच्या स्पर्धात्मक क्रिकेटमधील पुनरागमनाची प्रतीक्षा अधिकच लांबली आहे. आगामी सय्यद मुश्ताक अली टी-२० ट्रॉफीसाठी जाहीर झालेल्या बडोदाच्या १५ सदस्यीय संघात हार्दिकचा समावेश नाही. त्याचा भाऊ कृणाल पांड्या संघाचे कर्णधारपद भूषवणार आहे.

हार्दिक शेवटचा २४ मे रोजी आयपीएल २०२६ मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळला होता. तेव्हापासून तो दुखापतींमुळे क्रिकेटपासून दूर आहे. ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलिया 'अ' संघाविरुद्धच्या घरच्या एकदिवसीय मालिकेसाठी त्याची भारत 'अ' संघात निवड झाली होती, पण पोटरीच्या दुखापतीमुळे त्याला संघातून वगळण्यात आले होते.

आयपीएलनंतर, हार्दिकने बराच वेळ बंगळूरु येथील भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये घालवला आहे. आयपीएल दरम्यान, त्याला प्रथम पाठीचे स्नायू आखडण्याचा त्रास झाला आणि नंतर हॅमस्ट्रिंगला दुखापत झाली. हार्दिकचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना आयपीएलच्या अगदी आधी न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात झालेल्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेत होता. भारतीय संघ सध्या न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत व्यस्त आहे, त्यानंतर डिसेंबरमध्ये मायदेशात श्रीलंकेविरुद्ध टी-२० आंतरराष्ट्रीय मालिका खेळणार आहे.

पुढील वर्षी आफ्रिकेत एकदिवसीय विश्वचषक होणार असल्याने, भारतीय संघ व्यवस्थापनाला हार्दिक लवकरात लवकर संघात परत हवा आहे. तो मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील भारताच्या आघाडीच्या अष्टपैलू क्रिेकेटपटूंपैकी एक आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी आधीच स्पष्ट केले आहे की हार्दिक आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह संघासाठी महत्त्वाचे आहेत. पण पूर्णपणे तंदुरुस्त झाल्याशिवाय त्यांना विश्वचषकात खेळवले जाणार नाही. गंभीर यांनी म्हटले होते की, दोन्ही क्रिकेटपटूंना अपूर्ण तंदुरुस्तीसह विश्वचषकात नेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

कृणाल पांड्या व्यतिरिक्त, बडोदाच्या संघात जितेश शर्मा, दीपक हुडा आणि रसिक सलाम यांसारख्या महत्त्वाच्या खेळाडूंचा समावेश आहे. बडोदा संघ १४ नोव्हेंबर रोजी मुंबईत चंदीगडविरुद्ध आपल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी मोहिमेला सुरुवात करेल. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीची १९ वी आवृत्ती १४ नोव्हेंबर रोजी सुरू होणार आहे. बडोदा संघ चंदीगडविरुद्ध आपल्या मोहिमेला सुरुवात करेल.

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२६ साठी बडोदा संघ

कृणाल पांड्या (कर्णधार), अतीत सेठ (उपकर्णधार), दीपक हुडा, शिवालिक शर्मा, शशवत रावत, अमित पासी (यष्टीरक्षक), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), भानू पनिया, महेश पिठिया, परिक्षित पाटीदार, हेमंत पुंडे, राज लिंबानी, रसिक दार, ध्रुव बी. पटेल, सफवान पटेल

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande