
ठाणे, 07 नोव्हेंबर, (हिं.स.)। स्पोर्टिंग क्लब कमिटी द्वारा आयोजित शताब्दी चषक १४ वर्षाखालील आंतर क्लब स्पर्धेत, स्पोर्टिंग क्लब कमिटी ठाणे संघाचा उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित झाला आहे. उप उपांत्य फेरीच्या आजच्या सामन्यात, विजय क्रिकेट क्लब संघाच्या विरुद्ध स्पोर्टिंग क्लबने ६७७ धावांचा डोंगर उभा करून पहिल्या डावाच्या आघाडीवर उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला.
विहान आसवले याने ९ षटकार आणि ४५ चौकार मारून त्रिशतक झळकावले तर अद्वैत कचराज याने २६ चौकारांच्या मदतीने १५२ धावा ठोकल्या.
पाठोपाठ विहान पुजारीने १३ चौकारांच्या मदतीने ६५ धावांची खेळी केली.
स्पोर्टिंग क्लब तर्फे राशय सावंत याने ४७ धावात चार बळी घेऊन विजय क्रिकेट क्लब चा डाव १८९ धावांमध्ये गारद केला.
स्पोर्टिंग क्लब क्रिकेट संघाची गाठ उपांत्य फेरीत ठाणे रॉयल स्पोर्ट्स फाउंडेशन संघाशी ९/१० नोव्हेंबर रोजी सेंट्रल मैदान ठाणे येथे पडेल.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर