दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय महिला संघांची घोषणा; स्मृती मानधना सर्व फॉरमॅटमध्ये नेतृत्व करणार
नवी दिल्ली, 09 नोव्हेंबर (हिं.स.)भारतीय महिला संघ पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार आहे. या सर्व फॉरमॅटच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. फलंदाज जेमिमा रॉड्रिग्स दुखापतीतून सावरल्यानंतर तिन्ही फॉरमॅटच्या संघात परतली आहे.
स्मृती मंधाना


नवी दिल्ली, 09 नोव्हेंबर (हिं.स.)भारतीय महिला संघ पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार आहे. या सर्व फॉरमॅटच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. फलंदाज जेमिमा रॉड्रिग्स दुखापतीतून सावरल्यानंतर तिन्ही फॉरमॅटच्या संघात परतली आहे. दरम्यान, वेगवान गोलंदाजी करणारी अष्टपैलू क्रिकेटपटू अमनजोत कौरचा टी-२० संघात समावेश करण्यात आला आहे. पाठीच्या दुखापतीतून सावरल्यानंतर तीदेखील संघात परतली आहे. भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा ९ ते ३० डिसेंबर दरम्यान होणार आहे. या काळात दोन्ही संघ एक कसोटी, तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळतील.

स्मृती मानधना दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. ती तिन्ही फॉरमॅटमध्ये संघाचे नेतृत्व करेल. या एकमेव कसोटी सामन्यासाठी दीप्ती शर्माला उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. उमा छेत्रीला कसोटी संघातून वगळण्यात आले असून, जिंतिमणी कलिताचा संघात समावेश करण्यात आला आहे. उर्वरित संघात कोणतेही मोठे बदल नाहीत.

'द हंड्रेड' स्पर्धेदरम्यान जेमिमा रॉड्रिग्जला हॅमस्ट्रिंगची गंभीर दुखापत झाली. यामुळे ती महिला आशिया कप, आशियाई खेळांमधील भारताचे सुवर्णपदक आणि झिम्बाब्वेविरुद्धची मायदेशातील व्हाईट-बॉल मालिका खेळू शकली नाही. तिने २ नोव्हेंबर रोजी वरिष्ठ महिला टी-२० ट्रॉफीमध्ये स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. मुंबईकडून खेळताना, तिने उत्तर प्रदेशविरुद्ध नाबाद २९ धावा केल्या, त्यानंतर दिल्लीविरुद्ध ५८ धावांची खेळी केली. पुदुचेरीविरुद्ध ४७ चेंडूंमध्ये नाबाद १०७ धावा करून तिने आपला प्रभावी फॉर्मही दाखवला.

एकदिवसीय मालिका १६ डिसेंबर रोजी पार्ल येथे सुरू होईल. त्यानंतर दुसरा सामना १९ डिसेंबर रोजी केप टाऊनमध्ये आणि तिसरा सामना २२ डिसेंबर रोजी ब्लूमफॉन्टेनमध्ये खेळवला जाईल.तीन सामन्यांची टी-२० मालिका २६ डिसेंबर रोजी बेनोनी येथे सुरू होईल. दुसरा आणि तिसरा सामना अनुक्रमे २९ आणि ३० डिसेंबर रोजी पॉचेफस्ट्रूम येथे खेळवला जाईल.

भारताचा कसोटी संघ:

स्मृती मानधना [कर्णधार], शफाली वर्मा, प्रतिका रावल, हरमनप्रीत कौर, जेमिमाह रॉड्रिग्ज, हरलीन देओल, रिचा घोष [यष्टीरक्षक], यास्तिका भाटिया [यष्टीरक्षक], दीप्ती शर्मा [उपकर्णधार], श्री चरणी, स्नेह राणा, क्रांती गौड, नंदनी शर्मा, जिंतीमणी कलिता, सायली सातघरे

भारताचा एकदिवसीय संघ:

स्मृती मानधना [कर्णधार], शफाली वर्मा, प्रतिका रावल, हरमनप्रीत कौर, जेमिमाह रॉड्रिग्स, हरलीन देओल, रिचा घोष [यष्टीरक्षक], यास्तिका भाटिया [यष्टीरक्षक], दीप्ती शर्मा [उपकर्णधार], श्रीचरणी, वैष्णवी शर्मा, क्रांती गौड, नंदनी शर्मा, जिंतीमणी कलिता, सायली सातघरे

भारताचा टी-20 संघ:

स्मृती मानधना [कर्णधार], शफाली वर्मा [उपकर्णधार], जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर, निकी प्रसाद, ऋचा घोष [यष्टीरक्षक], जी. कमलिनी [यष्टीरक्षक], अनुष्का शर्मा, दीप्ती शर्मा, श्रीचरणी, प्रेमा रावत, अमनजोत कौर, क्रांती गौड, नंदनी शर्मा, रेणुका सिंग ठाकूर, अरुंधती रेड्डी, सायली सातघरे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande