प्रेमप्रकरणातून कोपरखैरणेत दोन युवतींवर गोळीबार; एकीच्या पाठीत गोळी अडकली, दुसरी जखमी
रायगड, 09 नोव्हेंबर (हिं.स.)। दिवाळीच्या उत्सवी वातावरणात नवी मुंबईतील कोपरखैरणे सेक्टर-१ येथे गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. प्रेमप्रकरणातून दोन युवतींना लक्ष्य करून गोळीबार करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
Two young women shot in Kopar Khairane; bullet lodged in one woman's back, the other also injured—incident linked to a romantic affair.


रायगड, 09 नोव्हेंबर (हिं.स.)। दिवाळीच्या उत्सवी वातावरणात नवी मुंबईतील कोपरखैरणे सेक्टर-१ येथे गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. प्रेमप्रकरणातून दोन युवतींना लक्ष्य करून गोळीबार करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेत एक युवती गंभीर जखमी झाली असून दुसऱ्या युवतीच्या कानाला दुखापत झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सेक्टर-१ परिसरात दोन युवतींवर गोळीबार करण्यात आला. यामध्ये एका युवतीच्या पाठीमध्ये गोळी अडकली, तर दुसऱ्या युवतीच्या कानाला गोळी लागली. अचानक झालेल्या गोळीबारामुळे परिसरात घबराट पसरली. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी जखमी युवतींना मदत केली. दोघींनाही तातडीने वाशी येथील महापालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू असून एका युवतीच्या पाठीमध्ये गोळी अडकल्याने तिच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

प्रेमप्रकरणातून हा गोळीबार झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात असला, तरी त्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून अन्य आरोपीचा शोध सुरू केला आहे. गोळीबारासाठी वापरण्यात आलेले शस्त्र, आरोपींची भूमिका आणि घटनेमागील पार्श्वभूमी यांचा पोलीस तपास करीत आहेत.

दिवाळीसारख्या सणाच्या काळात रहिवासी परिसरात गोळीबाराची घटना घडल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कोपरखैरणे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande