अकोला रेल्वे स्टेशनजवळील अतिक्रमित रेस्टॉरंटवर मनपा कारवाई
अकोला, 13 फेब्रुवारी (हिं.स.) – अकोला महानगरपालिका आयुक्त डॉ.सुनिल लहाने, मनपा उपायुक्त विजय पारतवार आणि पूर्व झोन कार्यालयाचे सहा.आयुक्त राजेश सरप यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे स्टेशनजवळील, उत्तर झोन कार्यालयाच्या रस्त्याच्या जागेत असलेल्या होटेल
Photo


अकोला, 13 फेब्रुवारी (हिं.स.) – अकोला महानगरपालिका आयुक्त डॉ.सुनिल लहाने, मनपा उपायुक्त विजय पारतवार आणि पूर्व झोन कार्यालयाचे सहा.आयुक्त राजेश सरप यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे स्टेशनजवळील, उत्तर झोन कार्यालयाच्या रस्त्याच्या जागेत असलेल्या होटेल न्यु क्वालिटी फेमिली रेस्टॉरंट या अतिक्रमणावर निष्कासनाची कारवाई करण्यात आली आहे.

या कारवाईत मनपा सहा.आयुक्त राजेश सरप, विठ्ठल देवकते, सहा.अतिक्रमण निर्मुलन अधिकारी चंद्रशेखर इंगळे, प्रवीण मिश्रा, कनिष्ठ अभियंता अक्षय बोर्डे, राहूल राऊत, पूर्व झोन मुख्य स्वच्छता निरीक्षक शैलेश पवार तसेच अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

----------------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande