
अकोला, 13 फेब्रुवारी (हिं.स.) – नागरिकांच्या मागणीनुसार तसेच आमदार रणधीर सावरकर आणि महापौर शारदा खेडकर यांच्या निर्देशानुसार, अकोला महानगरपालिका क्षेत्रातील थकित मालमत्ता कर धारकांसाठी मनपा आयुक्त डॉ.सुनिल लहाने यांच्या आदेशान्वये दि. 14 फेब्रुवारी 2026 पासून तीन टप्प्यात शास्ती अभय योजना (व्याज माफी योजना) सुरू करण्यात आली आहे.
या योजनेअंतर्गत:
14 फेब्रुवारी ते 5 मार्च 2026: संपूर्ण थकित कराचा भरणा केल्यास 100 टक्के शास्ती माफ.
6 मार्च ते 20 मार्च 2026: संपूर्ण थकित कराचा भरणा केल्यास 90 टक्के शास्ती माफ.
21 मार्च ते 31 मार्च 2026: संपूर्ण थकित कराचा भरणा केल्यास 85 टक्के शास्ती माफ.
महापौर शारदा रणजीत खेडकर यांनी शहरातील सर्व थकित मालमत्ता कर धारकांना थकित कराचा भरणा एकरकमी करून या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
याचबरोबर मनपा उपायुक्त विजय पारतवार यांनी नागरिकांना थकित व चालू वर्षातील मालमत्ता कर वेळेवर भरण्यास प्रोत्साहन देत, सील, जप्ती व लिलाव सारख्या अप्रिय कारवाई टाळून मनपा प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे