विजाभज आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांची इस्त्रो दौऱ्यासाठी निवड
कोल्हापूर जिल्ह्यातील इतर मागास बहुजन कल्याण, विभागाच्या विजाभज आश्रमशाळेतील चार विद्यार्थीनींची इस्रोसाठी निवड झाली
विजाभज आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांची इस्त्रो दौऱ्यासाठी निवड


कोल्हापूर, 13 फेब्रुवारी (हिं.स.)।

शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या विज्ञान प्रेरणा अभियान अंतर्गत राज्यातील विजाभज प्रवर्गातील आश्रमशाळेत शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांसाठी इस्त्रो भेट शैक्षणिक सहल 15 ते 20 फेब्रुवारी या कालावधीत आयोजित केली आहे.

या अभ्यास दौ-यासाठी शासनामार्फत विशेष परिक्षेचे आयोजन करुन विद्यार्थ्यांची निवड केलेली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील इतर मागास बहुजन कल्याण, विभागाच्या विजाभज आश्रमशाळेतील कु. संस्कृती संतोष वरेकर (इ. 11 वी), कु. रोशनी संतोष कांबळे (इ. 9 वी), कु. करिश्मा सुभाष रजपूत (इ. 9 वी), कु. रसिका अंबिदास गोंधळी (इ. 9 वी) या चार विद्यार्थीनींची निवड झाली आहे. ग्रामीण भागातील वंचित घटकातील विद्यार्थ्यांना अंतराळ विज्ञानाचा अभ्यास करण्याची संधी मिळाली आहे.

या उपक्रमांतर्गत विमान प्रवासाने पुणे ते इस्त्रोच्या मुख्यालयाला इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे यांच्या मार्गदर्शनाखाली भेट देऊन अंतराळ विज्ञानातील प्रगत तंत्रज्ञानाचा अनुभव घेणार आहेत, अशी माहिती इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहायक संचालकांनी दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande