टी-20 विश्वचषक : वेस्ट इंडिजचा संघ इटलीला पराभूत करत ग्रुप स्टेजमध्ये अपराजित
कोलकाता, 19 फेब्रुवारी (हिं.स.)टी-२० विश्वचषकातील आपल्या शेवटच्या गट फेरीच्या सामन्यात वेस्ट इंडिजने इटलीचा ४२ धावांनी पराभव केला. यासह, कॅरिबियन संघ गट फेरीत अपराजित राहिला. आता त्यांचा सुपर एट टप्पा २३ फेब्रुवारी रोजी सुरू होईल. वेस्ट इंडिजने इटल
शामर जोसेफ


कोलकाता, 19 फेब्रुवारी (हिं.स.)टी-२० विश्वचषकातील आपल्या शेवटच्या गट फेरीच्या सामन्यात वेस्ट इंडिजने इटलीचा ४२ धावांनी पराभव केला. यासह, कॅरिबियन संघ गट फेरीत अपराजित राहिला. आता त्यांचा सुपर एट टप्पा २३ फेब्रुवारी रोजी सुरू होईल. वेस्ट इंडिजने इटलीसमोर विजयासाठी १६६ धावांचे लक्ष्य ठेवले होते. पण इटलीचा संघ १८ षटकांत १२३ धावांवर सर्वबाद झाला. वेस्ट इंडिजने त्यांचे चारही सामने जिंकून गट क मध्ये अव्वल स्थान पटकावले. सुपर एटमध्ये, ते भारत, दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वेसह गट अ मध्ये आहेत.

शामर जोसेफने चार षटकांत ३० धावांत चार विकेट्स घेतल्या. मॅथ्यू फोर्डने चार षटकांत १९ धावांत तीन विकेट्स घेतल्या. गुडाकेश मोतीने दोन आणि अकील हुसेनने एक विकेट घेतली. इटलीसाठी बेन मॅनेन्टीने सर्वाधिक २६ धावा केल्या. जेजे स्मट्सनेही २७ चेंडूंत २४ धावा केल्या.

त्याआधी, कर्णधार शाई होपच्या अर्धशतकामुळे कॅरेबियन संघाने सहा विकेट गमावून १६५ धावा केल्या. होपने ४६ चेंडूत ७५ धावा केल्या, ज्यात सहा चौकार आणि चार षटकारांचा समावेश होता. रोस्टन चेस (२५ चेंडूत २४), शेरफेन रुदरफोर्ड (१५ चेंडूत नाबाद २४) आणि मॅथ्यू फोर्ड (आठ चेंडूत नाबाद १६) हे एकमेव उपयुक्त योगदान होते.

फलंदाजीला अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर, इटलीच्या फिरकीपटूंनी शिस्तबद्ध गोलंदाजी केली आणि दोन वेळा विजेत्या वेस्ट इंडिजला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले. बेन मॅनेन्टी ३७ धावात २ विकेट्स आणि कृष्णन कालुगामेगे २५ धावात २ विकेट्स घेतल्या. ज्यामुळे वेस्ट इंडिजला डेथ ओव्हर्समध्ये वेगाने धावसंख्या उभारता आली नाही. जर ग्रँट स्टीवर्टने १९ व्या षटकात १९ धावा दिल्या नसत्या तर वेस्ट इंडिजची परिस्थिती आणखी वाईट झाली असती.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande