रत्नागिरी : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत खेड, चिपळूणला कल्याण संघटकांचे दौरे
रत्नागिरी, 26 फेब्रुवारी, (हिं. स.) : माजी सैनिक / माजी सैनिक विधवा /विर नारी / वीर माता/वीर पिता यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत खेड आणि चिपळूण येथे कल्याण संघटकांच्या दौऱ्यांचे आयोजन करण्यात आल्याचे जिल्हा सैनिक
रत्नागिरी : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत खेड, चिपळूणला कल्याण संघटकांचे दौरे


रत्नागिरी, 26 फेब्रुवारी, (हिं. स.) : माजी सैनिक / माजी सैनिक विधवा /विर नारी / वीर माता/वीर पिता यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत खेड आणि चिपळूण येथे कल्याण संघटकांच्या दौऱ्यांचे आयोजन करण्यात आल्याचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी कळविले आहे.

सोमवार, दि. 9 मार्च रोजी सैनिकी मुलांचे वसतिगृह, खेड येथे आणि मंगळवार 10 मार्च रोजी सैनिकी मुलांचे वसतिगृह, चिपळूण येथे कल्याण संघटक अनिल मोरबाळे दौऱ्यावर असणार आहेत.

सोमवार 16 मार्च रोजी सैनिकी मुलांचे वसतिगृह, खेड आणि मंगळवार 17 मार्च रोजी सैनिकी मुलांचे वसतिगृह, चिपळूण येथे कल्याण संघटक राहुल काटे यांचा दौरा असेल. सोमवार 23 मार्च सैनिकी मुलांचे वसतिगृह, खेड आणि मंगळवार 24 मार्च रोजी सैनिकी मुलांचे वसतिगृह, चिपळूण येथे कल्याण संघटक अनिल मोरबाळे हे दौऱ्यावर असणार आहेत.

सोमवार 30 मार्च रोजी सैनिकी मुलांचे वसतिगृह, खेड आणि मंगळवार 01 एप्रिल रोजी सैनिकी मुलांचे वसतिगृह, चिपळूण येथे कल्याण संघटक सुनील कदम दौऱ्यावर असणार आहेत.

या दौऱ्यामध्ये अभिलेख कार्यालयविषयक, पेन्शनविषयक, महासैनिक पोर्टलवर रजिस्ट्रेशन (नोंदणी) तसेच इतर अडचणी सोडविण्यात येतील. मेळाव्यात येताना आपल्या सोबत www.mahsainik.maharashtra.gov.in वेबसाइटवर रजिस्ट्रेशन केलेली पावती, डिस्चार्ज पुस्तक, पीपीओची प्रत, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँकेचे पासबुक, इ.सी.एच.एस. कार्ड व आधार कार्डशी लिंक असलेला मोबाइल फोन इत्यादी कागदपत्रे सोबत आणावे व सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande