अकोला - महानगरपालिकेच्या दक्षिण झोन सभापती पदासाठी पूजा  गावंडे यांचे नामांकन दाखल
अकोला, 26 फेब्रुवारी (हिं.स.)। अकोला महानगरपालिकेच्या दक्षिण झोन सभापती पदासाठी आज नामांकन प्रक्रियेदरम्यान नगरसेविका पूजा पंकज गावंडे (राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष शरदचन्द्र पवार) यांनी आपला उमेदवारी अर्ज अधिकृतपणे दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत स
Photo


अकोला, 26 फेब्रुवारी (हिं.स.)।

अकोला महानगरपालिकेच्या दक्षिण झोन सभापती पदासाठी आज नामांकन प्रक्रियेदरम्यान नगरसेविका पूजा पंकज गावंडे (राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष शरदचन्द्र पवार) यांनी आपला उमेदवारी अर्ज अधिकृतपणे दाखल केला.

यावेळी त्यांच्यासोबत स्थायी समिती सभापती पदाच्या उमेदवार विजय अग्रवाल, पक्षाचे महानगर अध्यक्ष रफीक सिद्दीकी, नगरसेवक जयंता मसने, पंकज गावंडे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश संघटन सचिव जावेद जकारिया यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांनी नगरसेविका पूजा गावंडे यांना शुभेच्छा देत त्यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला.

दक्षिण झोन सभापती पदाची निवडणूक २ मार्च २०२६ रोजी होणार असल्याची माहिती देण्यात आली. त्यानिमित्त आज नियमानुसार नामांकन अर्ज दाखल करण्यात आला.

पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी विश्वास व्यक्त केला की, आगामी निवडणुकीत पूजा पंकज गावंडे यांना व्यापक पाठिंबा मिळेल आणि त्यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण झोनमधील विकासकामांना नवी दिशा मिळेल.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande