नाशिकमध्ये ब्लू बँड आयएनआरसी रॅली ऑफ महाराष्ट्र २०२५ ची सहावी फेरी सुरू
नाशिक, 26 फेब्रुवारी (हिं.स.) । देशातील इतर ठिकाणी होणाऱ्या रॅली फेऱ्यांपेक्षा नाशिकच्या रस्त्यांवर कार चालवणे अधिक आव्हानात्मक आहे. घाटांचे वळणदार डांबरी रस्ते आणि अवघड मार्ग चालकांसाठी खरी कस पाहतात, असे मत ब्लू बँड आयएनआरसी रॅलीचा सर्वोत्कृष्ट
नाशिकमध्ये ब्लू बँड आयएनआरसी रॅली ऑफ महाराष्ट्र २०२५ ची सहावी फेरी सुरू


नाशिक, 26 फेब्रुवारी (हिं.स.) । देशातील इतर ठिकाणी होणाऱ्या रॅली फेऱ्यांपेक्षा नाशिकच्या रस्त्यांवर कार चालवणे अधिक आव्हानात्मक आहे. घाटांचे वळणदार डांबरी रस्ते आणि अवघड मार्ग चालकांसाठी खरी कस पाहतात, असे मत ब्लू बँड आयएनआरसी रॅलीचा सर्वोत्कृष्ट विजेतेपदाचा दावेदार मंगळूरचे डीन मस्कारेनहास (टीएसआय रेसिंग) यांनी व्यक्त केले.

ब्लू बँड आयएनआरसी रॅली ऑफ महाराष्ट्र २०२५ च्या सहाव्या फेरीची नाशिकमध्ये सुरवात होत आहे. तत्पूर्वी पत्रकार परिषदेत कार चालकांनी पत्रकारांशी संवाद साधला.

मस्कारेनहास म्हणाले, “यंदाचा हंगाम माझ्यासाठी खास आहे. माझा सहकारी करूमवाह गगनची साथ नेहमीच उत्तम राहिली आहे. आमच्या समन्वयामुळे आयएनआरसी रॅलीसारख्या मोठ्या चॅम्पियनशिपमध्ये यश मिळवणे शक्य झाले आहे. नाशिकच्या घाट आणि वळणदार रस्त्यांवर हा आव्हानात्मक मार्ग आम्ही पार करून सर्वोत्कृष्ट विजेतेपद मिळवू.”

यावेळी उपविजेतेपदासाठी दावेदार कर्णकदूर म्हणाले, “प्रत्येक फेरीत वेगवेगळ्या भौगोलिक परिस्थितीशी जुळवून घेणे आवश्यक असते. नाशिकच्या वातावरणामुळे आणि घाटमालिका रस्त्यांमुळे आम्हाला नेहमीच नवीन काहीतरी शिकायला मिळते. यावेळीही आम्ही चांगली कामगिरी नोंदवू.”

दुसरा दावेदार आदित्य ठाकूर म्हणाले, “उपविजेतेपदापासून आम्ही फक्त थोडेच दूर आहोत. माझ्या सहचालक विरेंदा कश्यपची साथ आणि टीएसआय रेसिंग क्लबच्या मार्गदर्शनामुळे सहावी फेरीत यश निश्चित आहे. नाशिकच्या परिस्थितीमुळे जास्त सराव करावा लागतो, पण खरी कस येथेच दिसते.”

ब्लू बँड आयएनआरसी रॅलीसाठी नाशिककरांसाठी विशेष फेरी आयोजित करण्यात आली असून, सुपर स्पेशल स्टेज शुक्रवार (ता. २७) पासून सुरू होणार आहे. उद्या दुपारी चार वाजता ग्रेप कौंटी परिसरात ही फेरी होईल. नाशिककरांनी उपस्थित राहून मोटारस्पोर्ट्सचा अनुभव घ्यावा, असा आवाहन आयोजकांनी केला आहे.

या सोहळ्यास एनएमआरडीए महानगर आयुक्त जलल शर्मा, पोलिस आयुक्त संदीप कर्णीक आणि विशेष पोलिस महानिरीक्षक बाळासाहेब पाटील उपस्थित राहणार आहेत.

-------------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande