
सिंगापूर, २६ फेब्रुवारी (हिं.स.) भारतीय टेबल टेनिसपटू मानुष शाह आणि मानव ठक्कर यांनी सिंगापूर स्मॅशच्या उपांत्य फेरीत पोहोचून इतिहास रचला. जागतिक टेबल टेनिसमधील ग्रँड स्मॅश-स्तरीय स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचणारी ती पहिली भारतीय पुरुष दुहेरी जोडी ठरली.
सहाव्या मानांकित जोडीने बेल्जियमच्या मार्टिन ऍलेग्रो आणि ऍड्रियान रॅसेनफोसे यांचा सरळ गेममध्ये ३-० (११-८, ११-९, ११-९) असा पराभव केला. हा सामना २७ मिनिटे चालला. भारतीय जोडीने बेल्जियमच्या जोडीविरुद्धचा त्यांचा हेड-टू-हेड रेकॉर्ड २-० असा सुधारला. बेल्जियमच्या जोडीने उपांत्य पूर्व फेरीमध्ये अव्वल मानांकित जोडीला पराभूत केले होते हे उल्लेखनीय आहे. शुक्रवारच्या उपांत्य फेरीत भारतीय जोडीचा सामना फ्रान्सच्या चौथ्या मानांकित बंधू फेलिक्स लेब्रुन आणि ऍलेक्सिस लेब्रुनशी होणार आहे.
तत्पूर्वी, सहावी मानांकित भारतीय जोडी मानुष शाह आणि दिया चितळे यांना मिश्र दुहेरीच्या उपांत्य पूर्व फेरीमध्ये तिसऱ्या मानांकित ब्राझिलियन जोडी ह्यूगो
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे