
प्राग, 26 फेब्रुवारी (हिं.स.)प्राग आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महोत्सवाच्या मास्टर्स विभागाच्या पहिल्या फेरीत जागतिक विजेता डी गुकेशने काही तणावपूर्ण मधल्या गेममधील क्षणांचा सामना करत अमेरिकेच्या हान्स-मॉक निमनसोबत बरोबरी साधली. गुकेश पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळत होता. पण निमनने बर्लिन डिफेन्सचा अवलंब केला. दोन्ही बुद्धिबळपटूंमधील रोमांचक स्पर्धेची ही चांगली सुरुवात होती.
निमनने आक्रमक भूमिका घेतली आणि १३ व्या चालीवर एका प्याद्याला बळी दिला, ज्यामुळे पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळूनही गुकेशला मागे टाकले. त्यानंतर अमेरिकन बुद्धिबळपटूनेने वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न केला होता. पण भारतीय बुद्धिबळपटू गुकेशने चांगला खेळ केला आणि अखेर सामना बरोबरीत आणण्यात यश मिळवले. गुकेश वगळता, पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळणाऱ्या इतर सर्व बुद्धिबळपटूंनी पहिल्या फेरीत विजय मिळवला.
भारताचा गतविजेता अरविंद चिदंबरम, काळ्या मोहऱ्यांसह खेळत असताना, पहिल्या फेरीत उझबेकिस्तानच्या नोदिरबेक अब्दुसत्तोरोव्हकडून पराभूत झाला. तर नोदिरबेक याकुबबोएव्हने स्पेनच्या डेव्हिड अँटोन गुज्जारोचा पराभव केल. स्थानिक बुद्धिबळपटूने नवारा डेव्हिडने इराणच्या परहम मॅग्सौडलूचा पराभव केला.
चॅलेंजर्स विभागात महिला विश्वचषक विजेत्या दिव्या देशमुखने हंगेरीच्या अव्वल मानांकित बेंजामिन ग्लाडुरासोबत बरोबरी साधली.
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे