
नवी दिल्ली, 28 फेब्रुवारी (हिं.स.)इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यांमुळे इस्रायलचे हवाई क्षेत्र बंद करण्यात आले आहे. यामुळे एअर इंडियाने दिल्ली-तेल अवीव विमान मुंबईकडे वळवले.एअरलाइनने सांगितले की, २८ फेब्रुवारी रोजी दिल्लीहून तेल अवीवला जाणारी फ्लाइट AI139, इस्रायलचे हवाई क्षेत्र बंद झाल्यामुळे तसेच प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या हितासाठी विमान मुंबईकडे वळवण्यात आले आहे.
इस्रायलने इराणची राजधानी तेहरानसह अनेक शहरांवर हल्ला केला आहे. भारतीय वेळेनुसार शनिवारी सकाळी तेहरानसह अनेक शहरांमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आले आणि हवाई हल्ल्याचे सायरन वाजले. इराणनेही इस्रायलवर प्रत्युत्तरात्मक हल्ले सुरू केले आहेत. इराणने प्रत्युत्तर म्हणून सुमारे ४०० क्षेपणास्त्रे डागली आहेत.
एअर इंडियाने म्हटले आहे की, ते त्यांच्या उड्डाण ऑपरेशन्ससाठी सुरक्षा वातावरणाचे मूल्यांकन करत राहील आणि गरजेनुसार ऑपरेशन्स समायोजित करणार आहेत. हे विमान पाच तासांहून अधिक काळ हवेत होते आणि सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश केल्यानंतर एअरलाइनने परतण्याचा निर्णय घेतला.
या अचानक झालेल्या परिस्थितीमुळे प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल एअर इंडियानेही माफी मागितली आहे. दरम्यान, इंडिगोने सांगितले की, ते इराण आणि त्याच्या हवाई हद्दीशी संबंधित प्रादेशिक अद्यतनांवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे