रायगड - सावरोली–खालापूर कनेक्टर रोडवर भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा मृत्यू
रायगड, 28 फेब्रुवारी, (हिं.स.)। खालापूर पोलीस ठाणे हद्दीत सावरोली–खालापूर कनेक्टर रोडवर जिओ पंपासमोर भीषण अपघात होऊन एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी चालक आपल्या ताब्
Fatal accident on Savaroli-Khalapur connector road; Bike rider dies


रायगड, 28 फेब्रुवारी, (हिं.स.)। खालापूर पोलीस ठाणे हद्दीत सावरोली–खालापूर कनेक्टर रोडवर जिओ पंपासमोर भीषण अपघात होऊन एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी चालक आपल्या ताब्यातील कंटेनर (क्र. एमएच 46 एच 6454) खालापूरकडून सावरोलीकडे चालवत होता. सदर वाहन अतिवेगाने, बेदरकारपणे व रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालविण्यात येत असल्याचा आरोप आहे. नमूद ठिकाणी आल्यानंतर सावरोलीकडून येणाऱ्या दुचाकीला (क्र. एमएच 46 सीजी 1575) समोरून जोरदार धडक देण्यात आली.

या अपघातात दुचाकीस्वार विशाल सुभाष चाळके यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली.

या प्रकरणी खालापूर पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 66/2026 अन्वये भा.न्याय.सं. 2023 चे कलम 106(1), 281, 125 (अ), 125 (ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम 184, 134 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, सावरोली–खालापूर मार्गावर वाढती जड वाहनांची वर्दळ आणि वेगमर्यादेचे उल्लंघन यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. संबंधित विभागाने या मार्गावर वेग नियंत्रण व कडक अंमलबजावणी करावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande