प.बंगालमध्ये एसआयआर प्रक्रिया पूर्ण; एकूण मतदारसंख्या 7.04 कोटींच्या पुढे
कोलकाता, 28 फेब्रुवारी (हि.स.) : पश्चिम बंगाल राज्यात मतदार यादीच्या विशेष सखोल फेरनिरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेची सांगता झाल्यानंतर निवडणूक आयोगाने शनिवारी अद्ययावत मतदार यादीची आकडेवारी जाहीर केली. मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) मनोज कुमार अग्रवाल य
WB-SIR-VOTER-LIST-FINAL-ECI


कोलकाता, 28 फेब्रुवारी (हि.स.) : पश्चिम बंगाल राज्यात मतदार यादीच्या विशेष सखोल फेरनिरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेची सांगता झाल्यानंतर निवडणूक आयोगाने शनिवारी अद्ययावत मतदार यादीची आकडेवारी जाहीर केली.

मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) मनोज कुमार अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, या एसआयआर प्रक्रियेनंतर राज्यातील एकूण मतदारसंख्या आता 7.04 कोटींवर पोहोचली आहे. यापूर्वी ही संख्या 7.66 कोटी होती. मतदार यादीतील त्रुटी दूर करून ती अधिक अचूक आणि अद्ययावत करण्याच्या उद्देशाने ही प्रक्रिया भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राबविण्यात आली.

सीईओ मनोज कुमार अग्रवाल यांनी पुढे सांगितले की, या मोहिमेदरम्यान मोठ्या प्रमाणावर नावांची भर आणि वगळण्याची प्रक्रिया पार पडली. फॉर्म-6 आणि फॉर्म-6ए च्या माध्यमातून 1.82 लाखांहून अधिक नव्या मतदारांची नावे यादीत समाविष्ट करण्यात आली. तर फॉर्म-7 अंतर्गत कारवाई करून 5.46 लाखांहून अधिक अपात्र नावे वगळण्यात आली.

याशिवाय, पुनरावलोकन प्रक्रियेदरम्यान सुमारे 58 लाख गणना फॉर्म विभागाकडे प्राप्त झाले नाहीत. या प्रकरणांमध्ये प्रामुख्याने मृत मतदार, इतर ठिकाणी स्थलांतरित झालेले नागरिक किंवा एकापेक्षा अधिक वेळा नोंद (डुप्लिकेट) झालेली नावे यांचा समावेश होता.

एक महत्त्वाचा तांत्रिक मुद्दा स्पष्ट करताना सीईओंनी सांगितले की, सध्याच्या यादीत 60 लाखांहून अधिक मतदार ‘अंडर अॅडज्युडिकेशन’ (विचाराधीन) श्रेणीत समाविष्ट आहेत. त्यांच्या पात्रतेची तपासणी प्रक्रिया सुरू असली तरी, पोस्ट-एसआयआर मतदार यादीत त्यांना सध्या स्थान देण्यात आले आहे. मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी अधोरेखित केले की, संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविण्यात आली असून ती भारत निर्वाचन आयोग यांच्या कडक निकषांनुसार पूर्ण करण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande