
मुंबई, 03 फेब्रुवारी (हिं.स.)। गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड (जीपीएल) (बीएसई स्क्रिप आयडी: GODREJPROP) या देशातील आघाडीच्या रिअल इस्टेट कंपनीने जाहीर केले की, दक्षिण मुंबईतील वरळी येथे असलेल्या त्यांच्या ‘गोदरेज ट्रायलॉजी’ या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात २,००० कोटी रुपयांहून अधिक किमतीची घरे विकली गेली आहेत. या प्रकल्पात एकूण तीन टॉवर्सचा समावेश आहे. प्रारंभिक लाँच टप्प्यात तीनपैकी ‘सीटर्फ’ आणि ‘सीफ्रंट’ या दोन टॉवर्समधील निवडक मजल्यांवरील घरे सादर करण्यात आली. या टप्प्यात सुमारे ३,५०० कोटी रुपयांची एकूण इन्व्हेंटरी खुली करण्यात आली होती.
सुमारे २.६३ एकर परिसरात उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पात प्रशस्त ३ बीएचके आणि ४ बीएचके घरे उपलब्ध आहेत. प्रत्येक मजल्यावर केवळ तीनच सदनिका असल्यामुळे रहिवाशांना खासगीपणा आणि वेगळेपणाचा अनुभव मिळतो. नावाप्रमाणेच ‘गोदरेज ट्रायलॉजी’ या प्रकल्पातून तीन वेगवेगळ्या आणि नयनरम्य दृश्यांचा अनुभव मिळतो. येथून अरबी समुद्र, मुंबईची स्कायलाईन आणि ऐतिहासिक महालक्ष्मी रेसकोर्स यांचे अखंड विहंगम दृश्य पाहता येते. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हे टॉवर्स देशातील सर्वात उंच इमारतींपैकी एक असतील.
वरळी हे आज भारतातील सर्वाधिक मागणी असलेल्या निवासी परिसरांपैकी एक म्हणून ओळखले जाते. उत्तम कनेक्टिव्हिटी, महत्त्वाच्या व्यावसायिक केंद्रांजवळील स्थान आणि विकसित सामाजिक पायाभूत सुविधा यामुळे हा परिसर गृहखरेदीदारांसाठी आकर्षक ठरतो. या भागात नामांकित शाळा, रुग्णालये, रिटेल आऊटलेट्स तसेच प्रीमियम निवासी आणि व्यावसायिक प्रकल्प उपलब्ध आहेत, त्यामुळे जाणकार आणि निवडक गृहखरेदीदारांची ही पहिली पसंती ठरली आहे.
डॉ. अॅनी बेझंट रोडवर धोरणात्मकदृष्ट्या वसलेल्या गोदरेज ट्रायलॉजी प्रकल्पातून मुंबई कोस्टल रोडला अवघ्या दोन मिनिटांत पोहोचता येते. याशिवाय बांद्रा–वरळी सी लिंक आणि मेट्रो लाईन ३ जवळच असल्यामुळे प्रवास अधिक सोयीस्कर होतो. येथे राहण्याचा अनुभव अधिक समृद्ध करण्यासाठी काळजीपूर्वक आखलेली सुविधा व्यवस्था देण्यात आली आहे. यामध्ये पाच मजली क्लबहाऊस असून खासगी स्पा, रॅकेट क्लब आणि आधुनिक फिटनेस सेंटर्स यांचा समावेश आहे.
शाश्वत विकासाच्या बाबतीत कंपनीच्या जागतिक नेतृत्वाशी सुसंगतपणे, गोदरेज प्रॉपर्टीजला २०२५ मध्ये गव्हर्नन्स आणि सस्टेनेबिलिटी पद्धतींसाठी ग्लोबल रिअल इस्टेट सस्टेनेबिलिटी बेंचमार्ककडून जगात पहिला क्रमांक मिळाला आहे. याच विचारधारेतून गोदरेज ट्रायलॉजी हा प्रकल्प आईजीबीसी प्लॅटिनम प्री-सर्टिफाइड म्हणून डिझाइन करण्यात आला आहे. यामधून शाश्वत डिझाइन, पर्यावरणाची जबाबदारी आणि रहिवाशांच्या कल्याणाबाबतची कंपनीची ठाम बांधिलकी दिसून येते.
या प्रकल्पाबाबत प्रतिक्रिया देताना गोदरेज प्रॉपर्टीजचे एमडी आणि सीईओ गौरव पांडे म्हणाले, “गोदरेज ट्रायलॉजीला मिळालेल्या अतिशय सकारात्मक प्रतिसादामुळे आम्ही आनंदी आहोत. हा प्रतिसाद गोदरेज ब्रँडवर ग्राहकांचा असलेला विश्वास आणि मुंबईतील सर्वोत्तम परिसरांमध्ये दर्जेदार निवासी जागा निर्माण करण्याबाबतची आमची बांधिलकी दर्शवतो. उत्कृष्ट लोकेशन, डिझाइनची स्पष्ट संकल्पना आणि प्रीमियम जीवनशैली सुविधांमुळे गोदरेज ट्रायलॉजी लक्झरी हाउसिंग क्षेत्रातील आमची उपस्थिती अधिक दृढ करतो आणि प्रमुख शहरी केंद्रांमध्ये दर्जेदार प्रकल्प देण्याच्या आमच्या उद्दिष्टाला बळकटी देतो.”
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule