बजाज लाइफ इन्शुरन्सने सादर केला 'बीएसई 500 क्वालिटी 50 इंडेक्स फंड'
पुणे, 03 फेब्रुवारी, (हिं.स.)। भारतातील अग्रगण्य खासगी जीवन विमा कंपन्यांपैकी एक असलेल्या बजाज लाइफ इन्शुरन्सने आपला नवीन फंड ऑफर (NFO), ''बजाज लाइफ बीएसई 500 क्वालिटी 50 इंडेक्स फंड''च्या शुभारंभाची घोषणा केली आहे. मजबूत आर्थिक स्थिती, सातत्यपू
बजाज लाइफ


पुणे, 03 फेब्रुवारी, (हिं.स.)। भारतातील अग्रगण्य खासगी जीवन विमा कंपन्यांपैकी एक असलेल्या बजाज लाइफ इन्शुरन्सने आपला नवीन फंड ऑफर (NFO), 'बजाज लाइफ बीएसई 500 क्वालिटी 50 इंडेक्स फंड'च्या शुभारंभाची घोषणा केली आहे. मजबूत आर्थिक स्थिती, सातत्यपूर्ण कमाई आणि योग्य ताळेबंद असलेल्या भारतीय कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी गुंतवणूकदारांना देण्यासाठी हा फंड तयार करण्यात आला आहे. बजाज लाइफच्या युनिट-लिंक्ड विमा योजना (ULIPs) – बजाज लाइफ स्मार्ट वेल्थ गोल, बजाज लाइफ सुप्रीम आणि बजाज लाइफ गेन – अंतर्गत हा फंड उपलब्ध आहे, ज्यामुळे पॉलिसीधारकांना जीवन संरक्षण आणि दीर्घकालीन संपत्ती निर्मितीच्या दुहेरी फायद्याचा लाभ घेत आपल्या जीवनातील ध्येय साध्य करता येतील.

बाजारातील सततची अस्थिरता आणि बदलत्या स्थूल-आर्थिक परिस्थितीमुळे, गुंतवणूकदार आता मजबूत मूलभूत तत्त्वे आणि कमाईमध्ये शिस्त असलेल्या कंपन्यांवर अधिकाधिक विश्वास टाकत आहेत. गुंतवणुकीचा एक घटक म्हणून गुणवत्ता, नफाक्षमता, मजबूत ताळेबंद आणि कमाईच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रित केले जाते, ज्यामुळे ती वेगवेगळ्या मार्केट सायकल्समध्ये प्रासंगिक ठरते. बजाज लाईफ बीएसई 500 क्वालिटी 50 इंडेक्स फंड एका पारदर्शक आणि नियमांवर आधारित गुंतवणूक आराखड्याद्वारे गुंतवणूकदारांची गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो.

हा फंड बीएसई 500 क्वालिटी 50 इंडेक्सचे अनुसरण करतो. यात रिटर्न ऑन इक्विटी, अक्रूअल्स रेशो आणि फायनान्शियल लिव्हरेज यांसारख्या परिभाषित गुणवत्ता निकषांवर आधारित, व्यापक बीएसई ५०० समूहातून निवडलेल्या 50 कंपन्यांचा समावेश आहे. एकाच ठिकाणी सगळी गुंतवणूक होण्याचा धोका टाळत, स्टॉक-स्तरीय आणि क्षेत्र-स्तरीय मर्यादांचे पालन करत, फ्लोट-समायोजित बाजार भांडवल आणि गुणवत्ता गुणांच्या संयोजनाचा वापर करून घटक कंपन्यांना भारांश दिला जातो. फंडाची अद्ययावत माहिती देण्यासाठी आणि त्याची गुणवत्ता वैशिष्ट्ये टिकवून ठेवण्यासाठी निर्देशांकाचे तिमाही आधारावर पुनर्संतुलन केले जाते.

या लाँच प्रसंगी बजाज लाइफ इन्शुरन्सचे मुख्य गुंतवणूक अधिकारी श्रीनिवास राव रावुरी म्हणाले, “दीर्घकालीन गुंतवणुकीच्या या काळात, ज्या व्यवसायांमध्ये गुंतवणूकदार गुंतवणूक करतात त्या व्यवसायाची गुणवत्ता आणि मार्केटमधील चढ-उतारांचा त्यावर होणारा परिणाम यामुळे गुंतवणुकीचे परिणाम निश्चित होतात. ज्या कंपन्या भांडवलाचे सूज्ञपणे वाटप करतात, ताळेबंदात शिस्त राखतात आणि सातत्यपूर्ण नफा मिळवतात, त्या व्यापक बाजाराच्या तुलनेत अनिश्चिततेचा सामना अधिक चांगल्या प्रकारे करतात. पोर्टफोलिओ तयार करण्याचा आमचा दृष्टिकोन गुंतवणूकदारांना अशा टिकाऊ व्यवसायांमध्ये, सुव्यवस्थित आणि पारदर्शक उपायांद्वारे गुंतवणूक करण्याची संधी उपलब्ध करून देण्यावर केंद्रित आहे. शिस्तबद्ध गुंतवणूक आणि दीर्घकालीन आर्थिक नियोजन एकत्र आणण्याचा आमचा प्रयत्न म्हणजे, बजाज लाइफ बीएसई 500 क्वालिटी 50 इंडेक्स फंड. यामुळे पॉलिसीधारकांना अधिक सातत्य आणि लवचिकतेसह इक्विटीच्या वाढीमध्ये सहभागी होता येते.”

नवीन फंडाच्या शुभारंभासह, आपल्या युलिप (ULIP) प्लॅटफॉर्म अंतर्गत विचारपूर्वक डिझाइन केलेल्या गुंतवणूक उपायांची श्रेणी बजाज लाइफ इन्शुरन्स विस्तारते आहे. बजाज लाइफ बीएसई 500 क्वालिटी 50 इंडेक्स फंड गुंतवणूकदारांना नियम-आधारित, गुणवत्ता-केंद्रित दृष्टिकोनाद्वारे भारतीय इक्विटी बाजारात सहभागी होण्याची एक उत्तम संधी देतो. हा फंड कंपनीच्या दीर्घकालीन गुंतवणूक तत्त्वज्ञानाशी सुसंगत आहे, जे पॉलिसीधारकांना त्यांची आर्थिक आणि जीवनातील ध्येय साध्य करण्यासाठी शिस्तबद्ध पोर्टफोलिओ तयार करण्यास मदत करतो.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande