भारताकडून रशियन तेल खरेदी थांबवण्याचा कोणताही संकेत नाही- क्रेमलिनचे प्रवक्ते
मॉस्को, 03 फेब्रुवारी (हिं.स.)।क्रेमलिनने मंगळवारी स्पष्ट केले की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी व्यापार कराराची घोषणा झाल्यानंतर भारत रशियन तेलाची खरेदी थांबवणार असल्याचा कोणताही संकेत भारताकडून मिळालेला नाही. क्रेमलिनचे प्रवक्
भारताकडून रशियन तेल खरेदी थांबवण्याचा कोणताही संकेत नाही- क्रेमलिनचे प्रवक्ते


मॉस्को, 03 फेब्रुवारी (हिं.स.)।क्रेमलिनने मंगळवारी स्पष्ट केले की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी व्यापार कराराची घोषणा झाल्यानंतर भारत रशियन तेलाची खरेदी थांबवणार असल्याचा कोणताही संकेत भारताकडून मिळालेला नाही.

क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव यांनी सांगितले की,“या विषयावर नवी दिल्लीकडून आम्हाला अद्याप कोणतेही अधिकृत विधान प्राप्त झालेले नाही.” हे वक्तव्य ट्रम्प यांच्या त्या दाव्यानंतर एक दिवसाने आले आहे, ज्यामध्ये त्यांनी म्हटले होते की टॅरिफमध्ये सवलत देण्याच्या कराराअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियन तेलाची खरेदी थांबवण्याचे आश्वासन दिले आहे.पेस्कोव यांनी पत्रकारांशी बोलताना पुढे सांगितले,“आम्ही अमेरिका–भारत यांच्यातील द्विपक्षीय संबंधांचा आदर करतो, मात्र रशिया आणि भारत यांच्यातील प्रगत धोरणात्मक भागीदारीच्या विकासालाही तितकेच महत्त्व देतो. हे आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे आणि आम्ही दिल्लीसोबतचे द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत करण्याचा मानस ठेवतो.”

दरम्यान, मंगळवारीच क्रेमलिनने इशारा दिला की अमेरिका–रशिया यांच्यातील शेवटचा अण्वस्त्र करार या आठवड्यात संपुष्टात येणार असल्याने जग एका “धोकादायक” टप्प्याकडे वाटचाल करत आहे. न्यू स्टार्ट कराराची मुदत संपण्यास काहीच दिवस उरले असताना दिमित्री पेस्कोव यांनी सांगितले, “काही दिवसांतच जग आजच्या तुलनेत अधिक धोकादायक परिस्थितीत असेल.”रशियाने या करारातील काही अटी वाढवण्याचा प्रस्ताव दिला असून, क्रेमलिनने नमूद केले की जगातील दोन सर्वात मोठ्या अण्वस्त्र शक्तींकडे अण्वस्त्रांना मर्यादा घालणारा आणि नियंत्रणात ठेवणारा कोणताही मूलभूत करार उरणार नाही.

याचदरम्यान, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी मंगळवारी सांगितले की रशियाने रात्रीभर चाललेल्या मोठ्या हल्ल्यात युक्रेनवर सुमारे ४५० लांब पल्ल्याचे ड्रोन आणि विविध प्रकारच्या ७० क्षेपणास्त्रांचा मारा केला. हा हल्ला संयुक्त अरब अमिरातीतील अबू धाबी येथे अमेरिका मध्यस्थीने होणाऱ्या रशिया–युक्रेन चर्चेच्या एक दिवस आधी करण्यात आला आहे. या चर्चेचा उद्देश सुमारे चार वर्षांपूर्वी रशियाने सुरू केलेले पूर्णस्तरीय युद्ध समाप्त करणे हा आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande