तालिबानकडून गर्भनिरोधक औषधांवर पूर्ण बंदी; महिलांचे आरोग्य धोक्यात
काबुल , 03 फेब्रुवारी (हिं.स.)।अफगाणिस्तानात तालिबान सत्तेत आल्यानंतर महिलांशी संबंधित अनेक बाबींवर कठोर निर्बंध लादण्यात आले आहेत. आता या निर्बंधांच्या यादीत गर्भनिरोधक औषधांचाही समावेश करण्यात आला आहे. तालिबानने गर्भनिरोधक गोळ्यांवर पूर्णतः बंदी
तालिबानकडून गर्भनिरोधक औषधांवर पूर्ण बंदी; महिलांचे आरोग्य धोक्यात


काबुल , 03 फेब्रुवारी (हिं.स.)।अफगाणिस्तानात तालिबान सत्तेत आल्यानंतर महिलांशी संबंधित अनेक बाबींवर कठोर निर्बंध लादण्यात आले आहेत. आता या निर्बंधांच्या यादीत गर्भनिरोधक औषधांचाही समावेश करण्यात आला आहे. तालिबानने गर्भनिरोधक गोळ्यांवर पूर्णतः बंदी घातली असून, त्या विक्री करणाऱ्या सर्व दवाखाने आणि क्लिनिक बंद करण्याचे आदेश सरकारकडून देण्यात आले आहेत.

तालिबान सरकारने जारी केलेल्या फरमानानुसार डॉक्टरांनाही गर्भनिरोधक औषधे देणे किंवा गर्भपाताशी संबंधित कोणतीही मदत करण्याबाबत कडक इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे तालिबानच्या राजवटीत महिलांना गर्भनिरोधक औषधे मिळेनाशी झाली आहेत. संपूर्ण अफगाणिस्तानमध्ये गर्भनिरोधक गोळ्यांचा तुटवडा निर्माण झाला असून डॉक्टरांनीही आता असहाय्यता व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.

लहान वयात वारंवार प्रसूती होण्यामुळे अफगाणिस्तानमधील सुमारे ८० टक्के महिला कुपोषणाच्या विळख्यात सापडत असल्याचे समोर आले आहे. महिलांमध्ये रक्तक्षय (अ‍ॅनिमिया), जीवनसत्त्वांची कमतरता आणि उच्च रक्तदाबाच्या समस्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत.

दरम्यान, २७ ऑगस्ट २०२४ रोजी अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता प्रस्थापित झाल्यानंतर १२ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलींच्या शिक्षणावर बंदी घालण्यात आली. यासोबतच महिलांच्या घराबाहेर जाण्यावर आणि काम करण्यावरही निर्बंध लादण्यात आले. परिणामी रुग्णालयांमध्ये महिला डॉक्टर आणि परिचारिकांचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की अनेक महिलांना घरच्या घरीच प्रसूती करावी लागत आहे.

अफगाणिस्तानात दुकानांच्या बाहेरील फलकांवर महिलांची चित्रे लावण्यास बंदी, महिलांना कोणत्याही पुरुषाशिवाय एकट्याने घराबाहेर पडण्यास मनाई, महिलांना वाहनचालक परवाना दिला जाणार नाही, सर्व महिलांसाठी हिजाब परिधान करणे बंधनकारक, महिलांनी चेहरा व शरीर पूर्णपणे झाकूनच घराबाहेर पडावे आणि सार्वजनिक ठिकाणी बोलणे टाळावे असे काही निर्बंध महिलांवर आधीपासून लागू आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande