
रत्नागिरी, 4 फेब्रुवारी, (हिं. स.) : इयत्ता नववी व अकरावीमधील रिक्त जागांच्या प्रवेशासाठी नवोदय विद्यालयात येत्या 7 फेब्रुवारी रोजी पडवे येथे होणार आहे.
पडवे (ता. राजापूर) येथील पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय परीक्षा केंद्रावर सकाळी 11 ते दुपारी 1.45 वाजेपर्यंत ही परीक्षा होणार आहे. त्याकरिता विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र डाउनलोड करून घेऊन परीक्षा केंद्रावर सकाळी 10.30 वाजता विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे. प्रवेशापत्राशिवाय कोणत्याही विद्यार्थ्याला परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाणार नाही, याची सर्व विद्यार्थी व पालकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य एस. बसवराज यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी