
अकोला, 05 फेब्रुवारी (हिं.स.)महाराष्ट्र संशोधन, उत्तीर्ण व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या संस्थेकडून खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी विविध कल्याणकारी व कौशल्य विकासाच्या योजना राबवण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून जीसीसी-टीबीसी (शासकीय टंकलेखन व लघुलेखन) परीक्षा शुल्क परतावा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत लाभ अकोला जिल्ह्यातील 10 विद्यार्थ्यांना परतावा मिळाला आहे. या योजनेत प्रत्येक विद्यार्थ्याला 6 हजार 500 रु. प्रमाणे सर्व विद्यार्थ्यांना मंजूर करण्यात आली. सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम थेट जमा करण्यात आली आहे. आर्थिक अडचणीमुळे शिक्षण व प्रशिक्षणाचा खर्च पेलणे कठीण जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना मोठा दिलासा ठरली आहे. या आर्थिक सहाय्यामुळे प्रशिक्षणाचा भार कमी झाला असून, पुढील स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आत्मविश्वास वाढला आहे. अशी भावना लाभार्थ्यांनी व्यक्त केली आहे.
“खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील तरुणांनी शिक्षण व तांत्रिक कौशल्यांच्या माध्यमातून सक्षम व्हावे, हा अमृत संस्थेचा मुख्य उद्देश आहे. अकोला जिल्ह्यातील अधिकाधिक तरुणांनी अमृत संस्थेच्या विविध योजनांची माहिती घेऊन त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक धनंजय कुलकर्णी यांनी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे