मतदानासाठी परभणी जिल्ह्यातील कामगारांना भरपगारी सुट्टी
परभणी, 05 फेब्रुवारी (हिं.स.)। जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकीच्या अनुषंगाने शनिवार दि. 07 फेब्रुवारी, 2026 रोजी संबंधित जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतदार संघात सार्वजनिक सुट्टी जाहिर केली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील परभणी, गंगाखेड, म
मतदानासाठी परभणी जिल्ह्यातील कामगारांना भरपगारी सुट्टी


परभणी, 05 फेब्रुवारी (हिं.स.)।

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकीच्या अनुषंगाने शनिवार दि. 07 फेब्रुवारी, 2026 रोजी संबंधित जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतदार संघात सार्वजनिक सुट्टी जाहिर केली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील परभणी, गंगाखेड, मानवत, पाथरी, पुर्णा, सेलु, जिंतुर, सोनपेठ, पालम या जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदान क्षेत्रातील मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना मग ते कामानिमित्य निवडणुक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी, असे राज्य शासनाने अधिसूचनेमध्ये जाहिर केले आहे.

हे आदेश मतदार संघातील सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींना लागू राहील. अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी केवळ दोन ते तीन तासांची सवलत देता येईल. मात्र कोणत्याही परिस्थितीत कामगारांना मतदानासाठी सुट्टी देण्याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहील.

सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींच्या मालकांनी, व्यवस्थापनाने वरील आदेशाचे अनुपालन होईल याची खबरदारी घ्यावी. मतदारांना मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास त्यांच्या विरुध्द योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे सरकारी कामगार अधिकारी टि.ई.कराड यांनी कळविले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande