
परभणी, 05 फेब्रुवारी (हिं.स.)।
राज्यातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शासकीय वसतीगृह प्रवेशासाठी व वसतीगृह योजनेपासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना पंडित दीनदयाल उपाध्याय स्वंयम योजना व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी प्रवेश अर्ज https://hmas.mahait.org या शासनाच्या संकेतस्थाळावर ऑनलाईन अर्ज मागविण्याबाबत वेळापत्रक निश्चित झालेले आहेत.
12 वी नंतरच्या व्यावसायीक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या पदवी आणि पदव्युतर अभ्यासक्रमास (व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम) प्रवेशासाठी दि. 15 फेब्रुवारी, 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार दि. 16 ते 18 फेब्रुवारी या कालावधीत अर्ज छाननी करण्यात येईल. दि. 20 जून रोजी पहिली निवड यादी गुणवत्तेनुसार अंतिम करणे व प्रसिद्ध करण्यात येईल. पहिल्या निवड यादीनुसार प्रवेशाची अंतिम मुदत दि. 26 फेब्रुवारी राहील.
तरी वेळापत्रकानुसार शासनाच्या ऑनलाईन पोर्टलवर योजनेसाठी पात्र असणा-या इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर https://hmas.mahait.org या शासनाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरावेत. असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण सहायक संचालक रामेश्वर मुंडे यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis