अकोल्यात जिल्हास्तरीय लोकशाही दिनाला 6 तक्रारी निकाली!
अकोला, 05 फेब्रुवारी (हिं.स.)।लोकशाही दिन हा केवळ तक्रार निवारणाचा कार्यक्रम नसून, नागरिक व प्रशासन यांच्यातील संवादाचे व्यासपीठ आहे. या उपक्रमाचा जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज केले. दर महिन्या
अकोल्यात जिल्हास्तरीय लोकशाही दिनाला 6 तक्रारी निकाली!


अकोला, 05 फेब्रुवारी (हिं.स.)।लोकशाही दिन हा केवळ तक्रार निवारणाचा कार्यक्रम नसून, नागरिक व प्रशासन यांच्यातील संवादाचे व्यासपीठ आहे. या उपक्रमाचा जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज केले.

दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाहीदिन व दिव्यांग लोकशाहीदिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार लोकशाहीदिन उपक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात झाला. त्यात 6 तक्रारी निकाली काढण्यात आल्या. प्रत्येक अर्जाचा सखोल आढावा घेऊन संबंधित विभाग प्रमुखांना तात्काळ कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले. नव्याने 16 तक्रारी प्राप्त झाल्या असून, संबंधित यंत्रणांनी वेळेत कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.लोकशाही ही जनतेच्या सहभागातूनच बळकट होते. नागरिकांच्या अडचणींचे समाधान प्रशासनाने वेळेत व कार्यक्षमतेने केल्यास शासनावरचा विश्वास दृढ होतो. या उपक्रमात वैयक्तिक तक्रारी, न्यायालयीन प्रलंबित प्रकरणे, सेवा किंवा आस्थापनाविषयक तक्रारी या दिवशी स्वीकारल्या जात नाहीतलोकशाहीदिन उपक्रमाद्वारे नागरिकांच्या मागण्यांचे वेळेत निवारण, पारदर्शकता आणि जबाबदारी यावर भर देण्यात येत आहे. लोकशाही दिनाच्या माध्यमातून प्रशासन 'जनतेच्या दारी प्रशासन' ही संकल्पना प्रत्यक्षात आणत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande