
लातूर, 05 फेब्रुवारी (हिं.स.) : लातूर जिल्हा परिषद व त्याअंतर्गत 10 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवार, 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर, मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा तसेच मतदान शांततेत पार पडावे यासाठी जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आठवडी बाजार बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
यासाठी लातूर तालुक्यातील कन्हेरी, औसा तालुक्यातील लिंबाळा दाऊ, अशिव आणि किल्लारी, रेणापूर तालुक्यातील पानगाव, निलंगा तालुक्यातील आंबुलगा बु., चाकूर तालुक्यातील वडवळ ना. आणि जळकोट तालुक्यातील घोणसी येथे शनिवार, 7 फेब्रुवारीला भरणारे आठवडी बाजार बंद राहणार आहेत. या बाजारांचे आयोजन इतर दिवशी केले जाईल.
जिल्हाधिकारी यांनी सांगितले की, हा निर्णय मार्केट ॲण्ड फेअर ॲक्ट 1982 चे कलम 5(अ) आणि पणन संचालकांच्या मान्यतेनुसार घेतला आहे.या निर्णयामुळे निवडणूक प्रक्रियेत बाधा न येता सर्व मतदार मतदान करू शकतील, अशी अपेक्षा आहे.
---------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis