
लातूर, 05 फेब्रुवारी (हिं.स.) : इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाद्वारे लातूर जिल्ह्यात दोन शासकीय वसतिगृह सुरू करण्यात आली आहेत. सन 2023-24 पासून सुरू असलेल्या या वसतिगृहांत मुलांसाठी 100 आणि मुलींसाठी 100 अशा एकूण 200 विद्यार्थी क्षमतेची सोय करण्यात आली आहे.
या वसतिगृहांत विद्यार्थ्यांना भोजन, निवास आणि शैक्षणिक साहित्य मोफत पुरवले जाते. वसतिगृह प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांनी 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत https://hmas.mahait.org
या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी महाराष्ट्राचे रहिवाशी असावा. प्रवेशासाठी सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जातीचे प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक आहे, तसेच पालकांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. विद्यार्थी ज्या शहरात शैक्षणिक संस्था आहे त्या शहराचा स्थानिक रहिवासी नसावा आणि बारावीनंतरचे उच्च शिक्षण घेतलेले असावे. बारावीत किमान 60 टक्के गुण असणे अनिवार्य आहे.
सन 2025-26 साठी रिक्त जागांवरील प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांनी 18 सप्टेंबर 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज करावा.
मुलींच्या वसतिगृहाबाबत माहितीकरिता गृहपाल श्रीमती वृषाली बडे (मो. 9028261183) आणि मुलांच्या वसतिगृहाबाबत माहितीकरिता गृहपाल तिरुके सुरज (मो. 8329447410) यांच्याशी संपर्क साधावा, असे सहायक संचालक अभय अटकळ यांनी आवाहन केले आहे.
-----------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis