
दोन मालमत्तांवर सील; ६ लाखांहून अधिक कर थकीत
अकोला, ०५ फेब्रुवारी (हिं.स.) : अकोला महानगरपालिका क्षेत्रातील थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी मनपाने कडक पावले उचलली असून, उत्तर झोन अंतर्गत गांधी चौक परिसरातील दोन मालमत्तांवर सील लावण्याची कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने यांच्या आदेशान्वये तसेच अतिरिक्त आयुक्त सुमेध अलोने, उपायुक्त विजय पारतवार आणि सहाय्यक आयुक्त विठ्ठल देवकते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.गांधी चौक येथील दर्याव हाईट्समधील वार्ड क्रमांक C-1, मालमत्ता क्रमांक 735, मालक पवनकुमार व राजेशकुमार जगदीशप्रसाद गोयनका यांच्याकडे सन 2017-18 पासून आजपर्यंत एकूण 3,02,384 रुपये मालमत्ता कर थकीत होता. तसेच गांधी रोड येथील मालमत्ता क्रमांक 742, मालक सुरेश व संतोष गणपतलाल केदारमल अग्रवाल यांच्याकडे 2017-18 पासून 3,32,920 रुपये मालमत्ता कर थकीत असल्याने या दोन्ही मालमत्तांवर सील लावण्यात आले.
या कारवाईदरम्यान सहाय्यक अधीक्षक पंकज जोगळेकर, श्रीमती रंजना आंधळे, वरिष्ठ लिपिक हेमंत शेळवणे, लिपिक संतोष गाडेकर, मोहन घाटोळ तसेच सुरक्षा रक्षक बाळी इंगळे आदी कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान, अकोला महानगरपालिका प्रशासनाने सर्व मालमत्ता धारकांना आवाहन केले आहे की, त्यांनी आपला थकीत तसेच चालू वर्षाचा मालमत्ता कर एकरकमी भरून सील, जप्ती व लिलावासारख्या अप्रिय कारवाईपासून बचाव करावा.
------------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे