उमेदवारांना निवडणूक खर्चाचा हिशोब 15 फेब्रवारीच्या आत सादर करणे बंधनकारक
अकोला, 05 फेब्रुवारी (हिं.स.)। अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 च्या अनुषंगाने निवडणूक काळात उमेदवारांने केलेल्या खर्चाचा हिशोब मा.राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निकाल जाहीर झाल्याच्या दिनांकापासून 30 दिवसाचे आत म्हणजे दि. 15
Photo


अकोला, 05 फेब्रुवारी (हिं.स.)। अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 च्या अनुषंगाने निवडणूक काळात उमेदवारांने केलेल्या खर्चाचा हिशोब मा.राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निकाल जाहीर झाल्याच्या दिनांकापासून 30 दिवसाचे आत म्हणजे दि. 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत अकोला महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालय येथील निवडणूक हिशोब खर्च कक्ष येथे सादर करणे अनिवार्य आहे. निवडणूक खर्चाचा हिशोब घेण्याकरीता अकोला महानगरपालिका प्रशासनाव्दारा झोन निहाय/प्रभागनिहाय एकुण 6 कर्मचा-यांची नियुक्त करण्यात आली असून कृपया संबंधीतांनी याची नोंद घेऊन अकोला महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन मनपा प्रशासनाव्दारा करण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande