
रत्नागिरी, 5 फेब्रुवारी, (हिं. स.) :केंद्र शासनाच्या सूचनांनुसार वाहनमालकांचे अद्ययावत संपर्क तपशील वाहन प्रणालीमध्ये उपलब्ध नसल्यामुळे पीयूसीसी, विमा, कर, दंड (इ-चलन) इत्यादी वाहनासंबंधी महत्त्वाच्या सूचना वाहनधारकांपर्यंत पोहोचण्यात अडचणी निर्माण होतात. या पार्श्वभूमीवर पीयूसीसी सेवेसाठी वाहनमालकाचा आधार प्रमाणीकरण केलेला मोबाइल क्रमांक अनिवार्य करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतलेला आहे. त्यानुसार पीयूसीसी सेवा देताना वाहनमालकाचा आधार-प्रमाणीत केलेला मोबाइल क्रमांक उपलब्ध नसल्यास पीयूसीसी सेवा देण्यात येणार नाही, याची नोंद सर्व वाहन मालकांनी व पीयूसीसी केंद्रांनी घ्यावी, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.
ही प्रक्रिया वाहन प्रणालीवर दोन स्तरीय प्रमाणीकरण (Two Factor Authentication) वापरून राबविण्यात येणार आहे. त्याची संपूर्ण अंमलबजावणी एका महिन्याच्या कालावधीत पूर्णपणे कार्यान्वित करण्यात यावी, असेही सूचित करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी