रत्नागिरी : कोमसापच्या विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण संपन्न
रत्नागिरी, 5 फेब्रुवारी, (हिं. स.) : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेतर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व, कथाकथन व काव्यलेखन स्पर्धांचे बक्षीस वितरण जिल्हाध्यक्ष आनंद शेलार यांच्या अध्यक्षतेखाली झाले.

प्राचार्य मधुरा पाटील, जाधव, तालुकाध्यक्ष प्रा. चंद्रमोहन देसाई, उपशिक्षणाधिकारी नरेंद्र गावंड, विनायक हातखंबकर, अंजली पिलणकर, डॉ. आनंद आंबेकर, विद्याधर कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा समारंभ झाला.

या स्पर्धा युवा गट आणि खुला गट अशा दोन गटांमध्ये घेण्यात आल्या. त्या स्पर्धांचा गुणानुक्रमे निकाल असा -

वक्तृत्व - युवा गट - सेजल भार्गव मेस्त्री, (द्वितीय विभागून) गौरवी मंदार ओळकर, केतकी लक्ष्मीकांत केतकर, रिया सुनील वालम. खुला गट - जयंत गोपाळ फडके, मानसी मंगेश चव्हाण, (तृतीय विभागून) आभा राजेंद्र घाणेकर, दामोदर परशुराम लिंगायत

कथाकथन - युवा गट - गौरवी मंदार ओळकर, दीप्ती प्रकाश दोरखडे, सेजल भार्गव मेस्त्री. खुला गट - उमेश नामदेव मोहीम, मानसी मंगेश चव्हाण (तृतीय विभागून) जयंत गोपाळ फडके, संपत भाऊराव पाटील, उत्तेजनार्थ - संतोष शांताराम गार्डी. विशेष उल्लेखनीय कथा - नरेंद्र गावंड

काव्यलेखन - युवा गट - रत्नेश अनिल कांबळे, ईशिका अजय हरचकर, श्रावणी प्रवीण धनावडे. खुला गट - दत्ताराम शावरप्पा कांबळे, अमित शंकर पवार, मानसी मंगेश चव्हाण.

▪️सर्व विजयी स्पर्धकांना सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन, तसेच स्पर्धेत सहभागी स्पर्धकांनी सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले

सर्व स्पर्धांचे परूक्षण विनायक हातखंबकर, विशाखा सकपाळ, अनंत जाधव, डॉ. निधी पटवर्धन, प्रकाश सावंत यांनी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी

 rajesh pande