अंजनगावच्या सारडा महाविद्यालयात पुन्हा वादावादी, प्राचार्यांविरोधात गुन्हा दाखल
अमरावती, 08 फेब्रुवारी (हिं.स.)कर्तव्यावर उशिरा आल्याच्या कारणावरून प्राचार्यांनी आम्हाला अर्वाच्य शिवीगाळ केली व आमच्या अंगावर चालून आले अशी तक्रार प्राध्यापकांनी पोलिस ठाण्यात केली. या तक्रारीवरून प्राचार्यांविरोधत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जिल
अंजनगावच्या सारडा महाविद्यालयात पुन्हा वादावादी प्राचार्या विरोधात गुन्हा दाखल -प्राध्यापकांना शिवीगाळ केल्याचा आरोप


अमरावती, 08 फेब्रुवारी (हिं.स.)कर्तव्यावर उशिरा आल्याच्या कारणावरून प्राचार्यांनी आम्हाला अर्वाच्य शिवीगाळ केली व आमच्या अंगावर चालून आले अशी तक्रार प्राध्यापकांनी पोलिस ठाण्यात केली. या तक्रारीवरून प्राचार्यांविरोधत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जिल्ह्यातील प्रसिद्ध राधाबाई सारडा महाविद्यालयातील काही प्राध्यापकांना कॉलेजमध्ये येण्यास थोडा उशीर झाला. ते कॉलेजमध्ये येताच प्रवेशद्वार बंद करण्यात आले. त्यानंतर प्रा. सत्येंद्र गडपायले व त्यांच्यासोबत असलेले आठ ते दहा प्राध्यापकांना प्राचार्य वशिष्ठ चौबे यांनी आपल्या कक्षात बोलवले. त्यानुसार ते गेले असता ‘कॉलेज तुमच्या बापाचे नाही’, असे बोलून प्राचार्य चौबे आमच्या अंगावर आले आणि अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. आम्ही तेव्हा म्हटले की, आपला कार्यकाळ संपला आहे, आम्हाला त्रास देऊ नका, तेव्हा प्राचार्य चौबे यांनी म्हटले की, तुमच्याकडून जे करायचे ते करून घ्या अशी धमकी दिली. अशीच तक्रार प्रा. सत्येंद्र गडपायले यांनी अंजनगाव पोलिस स्टेशनमध्ये केली आहे. तक्रारीवरून पोलिसांनी रात्री प्राचार्य चौबे यांच्याविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

प्राचार्य चौबे हे गेल्या नऊ वर्षापासून महाविद्यालयीन कर्मचारी यांना मानसिक व आर्थिक त्रास देत आहे. कर्मचार्‍यांना कक्षात बोलावून मोठ्याने धमकावून कर्मचार्‍यांना निलंबित करण्याचा धमक्या देता. पगार कापणे असा प्रकार करतात. महिला कर्मचार्‍यांना अपमानास्पद वागणूक देतात. सुट्टीच्या दिवशी कर्मचार्‍यांना काम आहे म्हणून कॉलेजमध्ये बोलवितात. त्यांचा कार्यकाळ विद्यापीठ मान्यतेनुसार २ जानेवारी २०२६ रोजी संपुष्टात आला असल्याचे पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. अंजनगाव पोलिस स्टेशनमध्ये राधाबाई सारडा महाविद्यालयाच्या प्राचार्यविरुद्ध जवळपास सर्वच प्राध्यापक एकत्र आले होते. प्राचार्य चौबे विरुद्ध प्रचंड रोष प्राध्यापक मंडळी मध्ये दिसून येत होता. कार्यकाल संपलेला असताना अनअधिकृतपणे प्राचार्य यांच्या खुर्चीवर चौबे बसले असल्याचे प्राध्यापकांनी पत्रकारांना सांगितले. सारडा महाविद्यालयाच्या ६२ वर्षाच्या इतिहासातील प्राचार्यविरुद्ध प्राध्यापक संघर्षाची अशी ही पहिली घटना होय!

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande