सोलापूरमध्ये ढाब्यावर आढळल्या ईव्हीएम मशीन; राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांचा गंभीर आरोप
सोलापूर, 08 फेब्रुवारी (हिं.स.)सोलापूरच्या मोहोळमध्ये ईव्हीएम मशीन चक्क ढाब्यावर (हॉटेल) आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काही लोक या ईव्हीएम मशीन घेऊन जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उमेश पाटील यांनीकेलाआहे.दरम्यानहा प
सोलापूरमध्ये ढाब्यावर आढळल्या ईव्हीएम मशीन; राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांचा गंभीर आरोप


सोलापूर, 08 फेब्रुवारी (हिं.स.)सोलापूरच्या मोहोळमध्ये ईव्हीएम मशीन चक्क ढाब्यावर (हॉटेल) आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काही लोक या ईव्हीएम मशीन घेऊन जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उमेश पाटील यांनीकेलाआहे.दरम्यानहा प्रकार उघडकीस आल्यानंतर प्रशासकीय यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. मोहोळ शहरानजीक असलेल्या हॉटेल स्वराज्य येथे या ईव्हीएम मशीन घेऊन जाताना पकडल्याचा दावा,करण्यात येतोय. दरम्यान यावेळी 2 सीलबंद EVM मशीन देखील आढळून आल्याची माहिती आहे.

मोहोळ मतदारसंघात जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना मध्यरात्रीच्यासुमारास एक वेगळाच प्रकार घडला आहे. मोहोळ शहराजवळील एका हॉटेल आणि बारच्या परिसरात ईव्हीएम मशिन आढळून आल्याने लोकशाहीच्या या उत्सवात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उमेश पाटील यांनी हा प्रकार उघडकीस आणला असून त्यांनी यासंबंधित व्यक्तींना जाब विचारलाय.घटनेची माहिती मिळताच निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सीमा होळकर आणि पोलिस निरीक्षक हेमंत शेंडगे हे देखील घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान,याबाबत प्रशासनाला विचारले असता, या मशीन्स 'राखीव' स्वरूपातील होत्या असं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.मात्र उमेश पाटील यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली असून, मतदानाच्या प्रक्रियेत पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande