
टोकियो, 08 फेब्रुवारी (हिं.स.)।जपानमध्ये आज, रविवारी खालच्या सभागृहासाठी मतदान होत आहे. हे मतदान पंतप्रधान साना ताकाइची यांच्या जनमतसंग्रहासारखे पाहिले जात आहे आणि या निवडणुकीत साना ताकाइची यांचे राजकीय भविष्य ठरवले जाणार आहे. मुख्य लढत सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी आणि विरोधी ब्लॉक यांच्यात आहे.
जपानच्या निवडणुकीत महागाई आणि परवडणाऱ्या वस्तूंची उपलब्धता हे महत्वाचे मुददे आहेत. पगारवाढ आणि वाढती महागाईमुळे सामान्य जनता त्रस्त आहे. 2023 मध्ये खराब पीक येण्यामुळे तांदळाच्या किमतीत सुमारे 68 टक्क्यांची वाढ झाली आहे.यामुळे दररोजच्या अन्नपदार्थांच्या किमतीही खूप वाढल्या आहेत.
पंतप्रधान ताकाइची यांची लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी आणि जपान इनोव्हेशन पार्टी यांचा गठबंधन जर 310 जागा जिंकला, तर ते विरोधी नियंत्रित संसदच्या वरच्या सभागृहात बहुमत मिळवू शकतील. ताकाइची यांनी बहुमत न मिळाल्यास पदाचा राजीनामा देण्याचे आश्वासन दिले आहे.एका आठवड्यापूर्वी सुमारे 46 लाख लोकांनी आगाऊ मतदान केले होते, जे 2024 मधील मागील निवडणुकीच्या तुलनेत 2.5 टक्क्यांनी कमी आहे. मतदानातील घट उत्तर आणि पश्चिम भागातील जोरदार बर्फामुळे झाली असल्याचे सांगितले जाते. मतदार 289 एकल-मंडळीय निर्वाचन भागात सदस्यांची निवड करतील, तर उर्वरित जागा पक्षांसाठी प्रमाणभूत प्रतिनिधित्व मतदानाद्वारे ठरवली जातील.
अति रूढीवादी नेते ताकाइची यांनी ऑक्टोबरमध्ये जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून पदभार सांभाळला होता. त्यांची कार्यपद्धती आणि ‘काम, काम, काम’ हा नारा तरुण समर्थकांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. नवीन सर्वेक्षणांनुसार, ताकाइची यांच्या लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीला खालच्या सभागृहात मोठ्या विजयाची शक्यता आहे. नवीन मध्यममार्गी गठबंधन आणि वाढत चाललेल्या दक्षिणपंथी पक्षांनंतरही, विरोधक इतके विखुरलेले आहेत की ते खरी आव्हान निर्माण करू शकत नाहीत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode